AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी

नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात अॅड अंकिता शाह यांना झालेली मारहाण लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कार्यवाही करावी (Anil Galgali on Nagpur Police)

महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी
| Edited By: | Updated on: Oct 07, 2020 | 8:28 AM
Share

नागपूर : तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला वकिलाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे (Anil Galgali on Nagpur Police). या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही घटना लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये घडली. या घटनेवर आता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कार्यवाही करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे (Anil Galgali on Nagpur Police).

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, 25 मार्च 2020 रोजी नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात अॅड अंकिता शाह यांना मारहाण करण्यात आली, ही बाब माहिती अधिकार कायदा अंतर्गत 2 ऑक्टोबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या CCTV फुटेजमुळे स्पष्ट होत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाहीची अपेक्षा आहे. अॅड अंकिता शाह यांनी सुद्धा तक्रार केली आहे.

“नागपुरात अॅड अंकिता शाह ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि मोकाट कुत्र्यांच्या अधिकारासाठी लढण्याऱ्या कार्यकर्त्या आहेत. ज्या पद्धतीने एका अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मारहाण केली जाते ती खरोखरच निंदनीय आहे. सर्व अधिकारी दरवाजावर थांबले असून एकाला अशा पद्धतीने आत आणत गैर वर्तणूक करणे कायद्यात बसत नाही”, असं गलगली म्हणाले.

“आजही सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात आणि कित्येकदा नागरिकांना चांगली वर्तणूक दिली जात नाही, ही बाब या घटनेने अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रात अशा लोकांवर कार्यवाही करत कठोर शिक्षा झाली तर निश्चितपणे कोणत्याही पोलीस ठाण्यात भविष्यात असा प्रकार घडणार नाही”,अशी अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर विधिमंडळ वर्षभर सुरु राहणार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

Corona Update | मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर मोठी कारवाई

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.