ग्रामपंचायत उमेदवारांना RTPCR चाचणी बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर स्पष्ट केले.

ग्रामपंचायत उमेदवारांना RTPCR चाचणी बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

परभणीः ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत निवडणूक (GramPanchayat Election)पार्श्वभूमीवर उमेदवार अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिलाय. (RTPCR Test Mandatory For GramPanchayat Candidates, Big Decision Of District Collector)

परभणी जिल्ह्यात 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्रचाराच्या निमित्त सभा, कॉर्नर सभा आणि प्रत्येकाच्या भेटीगाठी होणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधींनी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

परभणी जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नामनिर्देशन केंद्रावर किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) जाहीर झालीय. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास 23 डिसेंबर 2020 पासून सुरुवात झालीय. राज्यातील 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. 2020-21 च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

संबंधित बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI