Pune| अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर

| Updated on: Mar 27, 2022 | 5:44 PM

शहरात असलेल्या शाळा प्रशासनाने या प्रकारच्या घटना घडू नये यासाठे सतर्क राहिले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञानाबद्दल माहिती देवून चांगला व वाईट स्पर्श म्हणजे नेमका काय? याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्श ज्ञानाविषयी जागृती होवून समोरील व्यक्तीच्या वर्तनाविषयी अवलोकन करण्याबाबत ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे.

Pune| अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – गेल्या काही दिवसात शहरात अल्पवयीन मुलींवर (Minor Girls)अत्याचार झाल्याच्या घटना आहे. या घटनेमुळे पुणे प्रशासन सतर्क(Pune Administration alert)  झाले आहे.यासाठी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ‘गुड टच, बॅड टच’ या व्हिडिओ फिल्मच्या माधयमातून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच कुठल्याही विद्यार्थ्याच्या घटनेला सामोरे जावे लागू नये. यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून व पुणे महापालिका प्रशासनाकडून ( Pune Municipal Administration)विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षकांनी हे करावे

शहरात असलेल्या शाळा प्रशासनाने या प्रकारच्या घटना घडू नये यासाठे सतर्क राहिले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञानाबद्दल माहिती देवून चांगला व वाईट स्पर्श म्हणजे नेमका काय? कोणत्या व्यक्तीने केलेला स्पर्श हा चांगला किंवा वाईट संबोधला जाईल ? याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्श ज्ञानाविषयी जागृती होवून समोरील व्यक्तीच्या वर्तनाविषयी अवलोकन करण्याबाबत ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. विविध पध्दतीच्या सर्व बाबींची कडक अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याबाबतची माहिती महापालिकेच्या ढोले पाटील रोड विभागाचे शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी दिली आहे.

अनोळख्या व्यक्तीची होणार चौकशी

यापुढे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरताना व सुटताना अशी दोन वेळेस उपस्थिती घेतली जाणार असून अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनव्दारे संपर्क साधून विद्यार्थ्याविषयी माहिती घेतली जाणार आहे. शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शालेय रखवालदारांच्या मार्फत कडक चौकशी केली जाणार असून शाळेत प्रवेशासाठी रजिस्टर ठेवले जाणार आहे. अनोळखी व्यक्तीला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शिक्षकांच्या लेखी परवानगी शिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय वेळेत विना परवानगी शाळेच्या बाहेर पडता येणार नाही. या विविध सूचनांची अंमलबजावणी शाळांना करावीच लागणार आहे.

Video : अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण संपन्न, गोपीचंद पडळकर यांचा दावा

डुअल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये iQoo U5x बाजारात, जाणून घ्या फीचर्स

देश विकणाऱ्या विचारधारेपासून काँग्रेस देशाला वाचवणार, लढा उभारणार : नाना पटोले