Pune Crime | शाळेतील स्वच्छतागृहात11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात कुठं घडला हा प्रकार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune Crime | शाळेतील स्वच्छतागृहात11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात कुठं घडला हा प्रकार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
Image Credit source: Tv9

मुलीला बाथरुमकडे नेले. तिथं तिच तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला. बाबत बाहेर कुणाला काही सांगितलेस, तर बघ’ असे म्हणत आरोपी तिथून निघूनही गेला. या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली. तिने घडलेले सर्वप्रकार आधी मैत्रीणीना सांगितलं त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले.

योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 25, 2022 | 11:36 AM

पुणे- शहरात अल्पवयीन मुलीवरील(Minor Girl) अत्याचाराच्या घटना सर्वसामान्यांसाठी धास्तीचा विषय बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थींनीवर खुनी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात 11  वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचे स्केच काढले, त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असताना आरोपी जनवाडी भागातील दारू गुत्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (Police) त्याठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मंग्या (वय – 32) असून शाळेत वॉचमन म्हणून काम करता असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या शाळेतपीडित मुलगी शिकते. घटनेच्यावेळी पीडित मुलगी शाळेत आली होती. त्याच दरम्यान आरोपी तिथे आला. त्याने पीडित मुलीची आपली ओळख असल्याचे भासवले. त्यानंतर मुलीला बाथरुमकडे नेले. तिथं तिच तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला. बाबत बाहेर कुणाला काही सांगितलेस, तर बघ’ असे म्हणत आरोपी तिथून निघूनही गेला. या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली. तिने घडलेले सर्वप्रकार आधी मैत्रीणीना सांगितलं त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. त्यानंतर मुलीच्य आईने पोलिसात याबाबत तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

शाळेत सुरक्षा महत्त्वाची

शिवाजीनगरमधील मध्यवस्तीमध्ये ही शाळा आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मुलींच्या शाळेत एखाद्याअनोळख्या व्यक्तीला कसे सोडण्यात आले. असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या गेटवर ओळखपत्र दाखवूनच आता सोडणं आवश्यक आहे. एखादी अनोळखी माणूस शाळेत येत मुलींशी बोलत असेल तर सुरक्ष व्यवस्थेविष चिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने सुरक्षेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे अशी चर्चा पालक वर्गात सुरु आहे.

सर्तकतेमुळे आरोपीला अटक

शिक्षिका, मुख्याध्यापकांची सतर्कता शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी लगेच कार्यवाही करीत पोलीस आणि पीडित मुलीच्या घरच्यांना माहिती दिली. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षिका या दोघांनी सतर्कता दाखविली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणींनी याविषयी आपल्या शिक्षिकांना सांगितले हेदेखील योग्यच केले. कारण ‘ती’ मुलगी बोलली आणि तिच्या मैत्रिणींनी शिक्षिकांना सांगितल्यामुळे हा प्रकार समोर आला. आरोपीचे स्केच तयार होऊन त्याला अटक करता आली.

…म्हणून आमदारांना आमिष दाखवायचे का?, संदिप देशपांडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

लायब्ररी सांगून OYO Hotel मध्ये गेली, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आई-वडिलांना तीन पानी चिठ्ठी

VIDEO: यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें