अमेरिकेपाठोपाठ जगातली दुसरी महासत्ताही भारताच्या पाठीशी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवद्यांनी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे घडवलेल्या आयईडी स्फोटात भारताच्या 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेपाठापोठ आता जगातील दुसरी महसत्ता असलेल्या रशियानेही भारता पाठिंबा दिला आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी […]

अमेरिकेपाठोपाठ जगातली दुसरी महासत्ताही भारताच्या पाठीशी!
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवद्यांनी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे घडवलेल्या आयईडी स्फोटात भारताच्या 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेपाठापोठ आता जगातील दुसरी महसत्ता असलेल्या रशियानेही भारता पाठिंबा दिला आहे.

रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन पाठिंबा दर्शवला आहे. रशियाने पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, दहशतवाद्यांविरोधातील लढाईसाठी आम्ही भारतासोबत आहोत, असे स्पष्टपणे व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन सांगितले.

भारत आणि रशिया या दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत बनवण्यासह दहशतवादविरोधी लढाईत सोबत काम करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. दहशतवादाचं समर्थन करणं सगळ्यांनी बंद केलं पाहिजे, असेही दोन्ही देशांनी म्हटले आहे. यावेळी व्लादिमीर पुतीन यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रणही दिले आहे.

संबंधित बातम्या :

…तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचा इशारा

भारतीय विंग कमांडरला सोडणार, इम्रान खान बिथरला!

सध्या नुसती ‘प्रॅक्टिस’, ‘रिअल’ अजून बाकीच : मोदी

पाकची मजबुरी की नवा डाव? इम्रान खानची 7 विधाने काय दर्शवतात?

पाकची 20 विमानं 10 किमी भारताच्या हद्दीत घुसली!

अटी-बिटी काही नाही, पायलटला सोडा, अन्यथा खैर नाही, भारताने पाकला ठणकावलं!