Nagar Parishad election Result 2025 : पडळकरांनी मैदान मारलं, काँग्रेसला मोठा धक्का
जत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे, जतमध्ये भाजपाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात पुन्हा एकदा महापविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे, तर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान जत नगर परिषदेचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या नगर परिषदेचा निकाल समोर आला आहे. जतमध्ये यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे, जत नगर परिषदेमध्ये सत्तातंतर झालं आहे. काँग्रेसला पराभवाचा मोठा झटका बसला आहे.
सांगलीच्या जत नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह दहा जागांवर या नगर परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजपाचे रवींद्र आरळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेस आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट,अशी चौरंगी लढत या ठिकाणी झाली होती. 24 पैकी 10 जागा भाजपाला, 9 काँग्रेसला , राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन आणि अपक्षला एक जागा मिळाली आहे, शिवसेना शिंदे गटाला इथे भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. गोपिचंद पडळकर यांनी जतमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का देत सत्तांतर घडवून आणलं आहे.
महायुतीला मोठं यश
दरम्यान राज्यात आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तब्बल 214 नगराध्यक्ष महायुती भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. महायुतीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 32 जागा मिळाल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे प्रत्येकी 9 च नगराध्यपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
