सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट, आदित्य ठाकरे आणि अण्णा हजारेंना Z दर्जाची सुरक्षा

भारतरत्न सन्मानीत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. तेंडुलकरला X कॅटेगरीतील सुरक्षा (Aaditya Thackeray get Z security) दिली होती.

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट, आदित्य ठाकरे आणि अण्णा हजारेंना Z दर्जाची सुरक्षा
| Edited By: | Updated on: Dec 25, 2019 | 12:09 PM

मुंबई : भारतरत्न सन्मानीत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. तेंडुलकरला X कॅटेगरीतील सुरक्षा (Aaditya Thackeray get Z security) दिली होती. ज्यामध्ये एक पोलीस चोवीस तास सचिनसोबत राहायचा. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray get Z security) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सचिन तेंडुलकरसोबत यापूर्वी चोवीस तास पोलसी असायचे पण आता चोवीस तास पोलीस सोबत नसणार. तेंडुलकरला आता एस्कॉर्ट सुरक्षा दिली जाऊ शकते. याशिवाय आदित्य ठाकरेंना Y+ सुरक्षा होती ज्यामध्ये वाढ करुन आता ती Z केली आहे. तर अण्णा हजारेंनाही Z सुरक्षा देण्यात आली आहे.

भाजप नेते एकनाथ खडसेंना आतापर्यंत एस्कॉर्टसह Y सुरक्षा मिळाली होती. आता त्यांना एस्कॉर्ट मिळणार नाही.

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांना Z+ सुरक्षा होती ती आता X केली आहे. वरिष्ठ वकील उज्वल निकम यांना Z+ सुरक्षा होती ती आता Y केली आहे. त्यासोबतच त्यांना एस्कॉर्ट सुरक्षा दिली जाईल.

45 हाय-प्रोफाईल व्यक्तिंना आणि नेत्यांच्या सुरक्षेत बदल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक तीन महिन्यांनी सुरक्षा समितीची बैठक बसते. इंटेलिजेंस एजेन्सी आणि पोलीस स्टेशनवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा घटवण्याची किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो.