सिद्धूची मंत्रीमंडळातूनही हकालपट्टी करा, सोशल मीडियावर संताप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांचं पाकिस्तानप्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असताना सिद्धूने पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली. यानंतर सिद्धूवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्याची पंजाबच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी सोशल मीडियावर #SackSidhuFromPunjabCabinet हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. यासोबतच #boycottsidhu हा हॅशटॅगही […]

सिद्धूची मंत्रीमंडळातूनही हकालपट्टी करा, सोशल मीडियावर संताप
Follow us on

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांचं पाकिस्तानप्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असताना सिद्धूने पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली. यानंतर सिद्धूवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्याची पंजाबच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी सोशल मीडियावर #SackSidhuFromPunjabCabinet हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. यासोबतच #boycottsidhu हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

सोनी टीव्हीने सिद्धूला द कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे त्याला मंत्रीमंडळातूनही काढून टाका, अशी मागणी होत आहे. सिद्धूने या हल्ल्याचा निषेध केला होता. पण त्याने यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं नाही. दहशतवादाचा कोणताही धर्म आणि देश नसतो, असं तो म्हणाला होता.

हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार नसल्याचं म्हणताच सिद्धूवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सिद्धूला शोमधून काढून टाका, अन्यथा शोवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा घेण्यात आला. यानंतर सोनी टीव्हीने सावध भूमिका घेत सिद्धूची हकालपट्टी केल्याचं बोललं जातंय.

सिद्धूचं पाकिस्तान प्रेम उफाळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सिद्धूने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावली होती. यापेक्षा विशेष म्हणजे जे पाकिस्तानचं सैन्य भारतीय जवानांवर दररोज गोळीबार करतं, त्या पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची सिद्धूने गळाभेट घेतली होती.

व्हिडीओ पाहा :