नारळाच्या झाडावर अडकलेल्या व्यक्तिची सुखरुपणे सुटका; 40 ते 45 फुटावर अडकून पडले

नारळाच्या झाडावर किमान चाळीस ते पंचेचाळीस फुट उंचीवर अर्धा ते पाऊण तास अडकून बसलेल्या थोरातांना काढण्यासाठी फायर अँड रेस्क्यूची कर्मचाऱ्यांनी एक्सटेंशन लेडर व रस्सीच्या साह्याने नारळाच्या झाडाला रस्सी बांधून थोरातांची सुखरूप सुटका केली.

नारळाच्या झाडावर अडकलेल्या व्यक्तिची सुखरुपणे सुटका; 40 ते 45 फुटावर अडकून पडले
पुण्यात नारळाच्या झाडावर अडकलेल्या व्यक्तिची सुखरुपणे सुटका
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 8:43 PM

पुणेः पुण्यातील नेताजीनगर वानवडी (Netajinagar Wanwadi) बिल्डिंग नंबर 21 या ठिकाणी नारळाच्या झाडावर (Coconut Tree) नारळ काढण्यासाठी सुजित ज्ञानदेव थोरात चढले होते. त्यावेळी नारळ काढून उतरताना त्यांनी वापरलेले स्टॅन्ड (Stand) अचानक घसरू लागले. मात्र प्रसंगावधन राखून त्यांनी झाडाचा आधार घेत झाडावरच अडकून राहिले. ज्या ठिकाणी ते अडकले होते, त्याची उंची अंदाजे 40 ते 45 फूट होती. त्यांनंतर त्यांना या घटनेची फोनवरुन माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. फायर अँड रेस्क्यूच्या मदतीने लेडर आणि रस्सीच्या साहाय्याने सुजित थोरात यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

सुजित थोरात हे नारळ काढण्यासाठी झाडावर चढले होते. त्यावेळी ज्याच्या साहाय्याने झाडावर चढले होते, आणि नारळ काढताना पायातील साधन ते घसरु लागले. झाडावरुन ते खाली घसरु लागल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून त्यांनी झाडाचा आधार घेऊन ते झाडावरच थांबले. त्यानंतर त्यांना झाडावरुन खाली उतरण्यासाठी आणि मदतीसाठी फोन करण्यात आला. त्यानंतर थोरातांना मदत करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी फायर अँड रेस्क्यूची कर्मचारी दाखल झाले.

सुखरुपपणे सुटका

नारळाच्या झाडावर किमान चाळीस ते पंचेचाळीस फुट उंचीवर अर्धा ते पाऊण तास अडकून बसलेल्या थोरातांना काढण्यासाठी फायर अँड रेस्क्यूची कर्मचाऱ्यांनी एक्सटेंशन लेडर व रस्सीच्या साह्याने नारळाच्या झाडाला रस्सी बांधून थोरातांची सुखरूप सुटका केली. सुजित थोरात यांची सुखरुपपणे सुटका करण्यासाठी चालक मंगेश काळे, फायरमन संदीप जगताप, अनिमिष कोंडगेकर, मनोज गायकवाड, अक्षय तारू यांची मदत झाली.

दुर्घटना टळली

सुजित थोरात ज्या नाराळाच्या झाडावर अडकून पडले होते. त्या झाडावरुन खाली उतरताना जर अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. कारण नारळाच्या झाडाची उंची जादा असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांची सुखरुपपणे सुटका करुन झाल्यानंतर त्यांना झाडावरुन खाली ज्या टीमने उतरवले त्यांचे आभार मानण्यात आले.

संबंधित बातम्या 

KDMC : केडीएमसीत असिस्टंट नर्स पदांसाठी भरती! थेट मुलाखत होणार, अप्लाय कसं करायचं? जाणून घ्या

Sanjay Raut : पक्षपाती कारवाया पाहून पवारांना अस्वस्थ वाटलं असेल, मोदी भेटीनंतर राऊतांकडून पवारांचे आभार

KKR vs MI Playing XI IPL 2022: मुंबईच्या संघात दोन मोठे बदल, 18 वर्षाच्या खेळाडूचा डेब्यू