साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, बीडचाही विकास करा, साई भक्तांची मागणी

| Updated on: Jan 21, 2020 | 7:28 PM

साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला आहे. त्यात आता बीडकरांनीही उडी घेतली (Saibaba Birthplace dispute) आहे.

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, बीडचाही विकास करा, साई भक्तांची मागणी
Follow us on

बीड : साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला आहे. त्यात आता बीडकरांनीही उडी घेतली (Saibaba Birthplace dispute) आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही  काळ वास्तव्यास होते. या ठिकाणी साईबाबांनी नोकरी केली होती. त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडचा तीर्थक्षेत्र विकास करावा अशी मागणी बीडमधील साई भक्तांनी केली (Saibaba Birthplace dispute). आहे.

साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला. ते थोडे मोठे झाल्यानंतर एका अवलियाने शेलूमध्ये नेलं. शेलूमध्ये त्यांना गुरुपदेश झाला. त्यानंतर ते भ्रमंती करु लागले. भ्रमंती करत असताना ते बीडमध्ये आल्याचा उल्लेख आहे. बीड गावात ते आले. अनेक जुने उल्लेख आढळतात.

बीडमध्ये पेठभागातील साळीगल्लीत ते आले होते. हातमागाचा व्यापार बीडमध्ये होता. ते हातमागाच्या दुकानात नोकरीला होते. त्यामुळे जेथे जेथे साईबाबा गेले त्या ठिकाणी स्मृतीस्थळ केलं, त्या गावाचा विकास होईल अशी मागणी बीड ग्रामस्थांनी केली आहे.

त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारने आणि शिर्डी संस्थानने निधी द्यावा. तसेच या ठिताणी स्मृती स्थळ उभारण्यात यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली (Saibaba Birthplace dispute) आहे.

साई बाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादात औरंगाबादच्या धुपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा (Dhupkheda)असून बाबा सर्वात आधी इथेच दिसले असून तिथला विकास करण्यासाठी निधी द्या, असा ठराव धुपखेडाच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

संबंधित बातम्या : 

साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात…

साईंचा जन्म आमच्या गावातील, पाथरी, शिर्डी वादात धुपखेडातील ग्रामस्थांची उडी

शिर्डी वाद : दोन मुद्द्यांनी शिर्डीकरांचं समाधान, वादावर तोडगा निघाल्याची भावना