VIDEO : अपंग मुलीने पायाने रेखाटलं सलमानचं चित्र, सलमान म्हणतो…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चाहत्यांना वेळ देत असतो. कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमात चाहत्यांशी तो बोलतो, सेल्फी काढतो.

VIDEO : अपंग मुलीने पायाने रेखाटलं सलमानचं चित्र, सलमान म्हणतो...
| Edited By: | Updated on: Jul 17, 2019 | 5:42 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चाहत्यांना वेळ देत असतो. कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमात चाहत्यांशी तो बोलतो, सेल्फी काढतो. सलमानच्या या वागणुकीमुळे चाहता वर्गही नेहमीच त्याच्यावर खूश असतो. सलमानने सध्या सोशल मीडियावर अशाच एका खास चाहत्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण सलमानच्या या खास चाहत्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये सलमानचा एका दिव्यांग चाहता दिसत आहे. त्याने चक्क पायाने सलमान खानचे हुबेहूब चित्र रेखाटलेले दिसत आहे. यावर सलमानेही त्याचे कौतुक केले आहे.

सलमान खानही एक चांगला चित्रकार आहे. पण त्याच्या चाहत्याने काढलेले चित्र पाहून सलमान खानही चाहत्यावर खूश झालेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सलमान म्हणाला, गॉड ब्लेस…. या प्रेमाच्या बदल्यात मी काही देऊ शकत नाही, पण तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि तुला खूप सारे प्रेम.

सलमान खान सध्या आपल्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘इंशाअल्लाह’ आणि ‘किक 2’ चित्रपटाची तयारीही तो करत आहे.