‘ठाकरे’ प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेड आक्रमक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमाला संभाजी ब्रिगेड या संघटनेने विरोध केला आहे. केवळ विरोध नव्हे, तर ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष कपिल ढोके यांनी दिला आहे. ‘ठाकरे’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित केलेल्या दृश्यांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून, ते दृश्य सिनेमातून […]

ठाकरे प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेड आक्रमक
Follow us on

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमाला संभाजी ब्रिगेड या संघटनेने विरोध केला आहे. केवळ विरोध नव्हे, तर ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष कपिल ढोके यांनी दिला आहे.

‘ठाकरे’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित केलेल्या दृश्यांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून, ते दृश्य सिनेमातून तात्काळ वगळावे, अन्यथा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

येत्या 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेेमाची निर्मिती शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात विशेष आकर्षण म्हणजे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने केली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे.

बाळासाहेबांचा शिवसेना स्थापन करण्याआधीचा काळा आणि शिवसेना स्थापन केल्यानंतरचा काळ, असा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. मात्र, सिनेमात नेमके कोणते प्रसंग आहे, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर :