सांगवी आरोग्य केंद्राला छळ केंद्र म्हणून देशात पहिला क्रमांक मिळेल – अनिल गोटे

भाजपासंचलित धुळे जिल्हा परिषदेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.

सांगवी आरोग्य केंद्राला छळ केंद्र म्हणून देशात पहिला क्रमांक मिळेल - अनिल गोटे
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 4:23 PM

धुळे : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आज सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपरवर (Bjp) निशाणा साधला आहे. भाजपासंचलित धुळे जिल्हा परिषदेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. यावेळी आदिवासी भागातील रुग्णालयांची व्यवस्थाही रामभरोसे असल्याचं त्यांनी म्हटलं. (Sangvi Primary Health Center can be number one torment center in the country said by Anil Gote)

‘धुळे जिल्ह्यातील बहुचर्चीत आणि विकासाचा आदर्श म्हणून डांगोरा पिटणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आदिवासींचा छळ, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि भोळ्या भाबड्या आदिवासींच्या आरोग्याचे छळ केंद्र म्हणून कदाचित देशात पहिला क्रमांक मिळू शकेल’ असा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला.

सांगवी आरोग्य केंद्रातील अनागोंदी अवहेलना व निष्पाप अभ्रकांचे मृत्यु या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती यावेळी अनिल गोटे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेत भाजपाची एकछत्री सत्ता आल्यापासून बेकायदेशीर कारभार, अनागोंदी कायदे धाब्यावर बसवून काम करण्याची हुकूमशाही वृत्ती या गोष्टींचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागांवर झाला असल्याचंही यावेळी अनिल गोटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘गरीब आदिवासींच्या जीवनाशीचा खेळ खंडोबा मांडला आहे. जी दुरावस्था सांगवीमध्ये आहे, तिच परिस्थिती थोड्या फार फरकाने सर्वत्र आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ठिकाणी महिलांचे अतोनात हाल होतात. मात्र, तरीदेखील संपर्क साधून कोणी याठिकाणी दखल घ्यायला तयार होत नाही. सोयी-सुविधांच्या अभावि अनेकांचा जीवदेखील जातो. त्यामुळे आदिवासी भागातील रुग्णालयाची अवस्था सध्यातरी रामभरोसे दिसून येत आहे.’ असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या –

Anil Gote on Padalkar | ‘डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही’, अनिल गोटे यांची पडळकरांवर टीका

“फडणवीसांकडून सत्याची अपेक्षा म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करणे”

(Sangvi Primary Health Center can be number one torment center in the country said by Anil Gote)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.