सारा-सुशांतची केमेस्ट्री, ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. अगदी कमी वेळात ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचे यूट्यूबवरील हिट्सवरुन लक्षात येते. कसा आहे ट्रेलर? ‘केदारनाथ’ चित्रपटाचं कथानक प्रेमकथेवर आधारलेलं आहे. सारा आणि सुशांतची लव्हस्टोरी यात दाखवण्यात आल्याचे […]

सारा-सुशांतची केमेस्ट्री, ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. अगदी कमी वेळात ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचे यूट्यूबवरील हिट्सवरुन लक्षात येते.

कसा आहे ट्रेलर?

‘केदारनाथ’ चित्रपटाचं कथानक प्रेमकथेवर आधारलेलं आहे. सारा आणि सुशांतची लव्हस्टोरी यात दाखवण्यात आल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येते. हिंदू तरुणीच्या भूमिकेत सारा, तर सुशांत मुस्लिम तरुणाच्या भूमिकेत आहे. त्या अनुशंघाने दोघांमधील लव्हस्टोरी या चित्रपटात फुलत जाते.

दुसरीकडे, केदारनाथमध्ये त्सुनामीचं संकट आल्याचं दाखवण्यात आले आहे. त्सुनामीचे दृश्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे असेल, हे ट्रेलरवरुनच लक्षात येते.

अवघ्या तीन मिनिटांचा केदारनाथचा ट्रेलर प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास भाग पाडेल, अशा प्रतिक्रिया ट्रेलर पाहणाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

या चित्रपटातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे साराच्या अभिनयाबद्दल बॉलिवूडसह सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहेच. त्याचसोबत, सारा आणि सुशांतच्या केमेस्ट्रीबद्दलही प्रचंड उत्सुकता दिसून येते आहे.

सिनेदिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, येत्या 7 डिसेंबर रोजी केदारनाथ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें