‘सारेगमप लिटिल चॅम्प’ विजेत्या कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा

कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली.

सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा
फोटो सौजन्य : @mayurpoharkar_photography आणि कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम
| Updated on: Jul 28, 2020 | 8:52 AM

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा झाला. पुण्याचा व्यावसायिक रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकी लगीनगाठ बांधणार आहे. (SaReGaMaPa Little Champ winner Kartiki Gaikwad Engagement)

‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यासारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी चिमुरडी कार्तिकीच अनेकांच्या स्मरणात आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळातच म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला.

कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत रविवार 26 जुलैला साखरपुडा संपन्न झाला. लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

साखरपुड्यानंतर कार्तिकी आणि रोनित यांनी चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शूट केले आहे. यामध्ये दोघांची जोडी अत्यंत देखणी दिसत आहे.

फोटो सौजन्य : @mayurpoharkar_photography आणि कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम

कार्तिकीचा भावी जोडीदार रोनित पिसे पुण्याचा राहणारा असून इंजिनिअर आहे. त्यालाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. त्यामुळे कार्तिकी-रोनित यांच्या संसारात सूर-तालाची साथ असेल, यात शंका नाही.

गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरु कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते. जवळपास 12 वर्षांपूर्वी सारेगमपच्या ‘लिटिल चॅम्प’ पर्वातून कार्तिकीचा प्रवास सुरु झाला. दरम्यानच्या काळात तिने अनेक मैफिली आपल्या दमदार आवाजाने गाजवल्या आहेत. भक्तीसंगीत ते लावणी अशा हरतऱ्हेची गाणी कार्तिकीच्या गळ्यात शोभतात.