पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात दारु पार्टी, काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं

| Updated on: Feb 23, 2020 | 12:07 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना दारु पार्टी करताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली (Pune University student drinking alcohol hostel) आहे.

पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात दारु पार्टी, काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं
Follow us on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना दारु पार्टी करताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली (Pune University student drinking alcohol hostel) आहे. काल (22 फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेची काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये काही विद्यार्थी रात्रीच्या सुमारास दारुची पार्टी करत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या 512 क्रमांकाच्या खोलीमधून आवाज येत होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी हा दरवाजा ठोठावून विचारण्याचा प्रयत्न केला.

मात्र हा दरवाजा न उघडल्याने विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना सांगितला. त्यानंतर सुरक्षारक्षक आल्यावर त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र सुरक्षारक्षकांनाही कोणताही प्रतिसाद न मिळल्याने त्यांनी खिडकीच्या काचा फोडून दरवाजा उघडला. त्यावेळी 3 विद्यार्थी खोलीमध्ये पार्टी करत असल्याचं समोर आलं.

दरम्यान दारुची पार्टी करणार हे विद्यार्थी राज्यशास्त्र विभागाचे असल्याचे बोललं जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासन यावर काही कारवाई करणार का? अशा प्रश्न उपस्थित केला जात (Pune University student drinking alcohol hostel) आहे.