
वाढते तणावग्रस्त जीवन आणि नातेसंबंधातील दुरावा यामुळे मानवाला एकटेपणा सतावत आहे. अनेक घरांमध्ये आता एखादा पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढत आहे. आता कुत्र्या आणि मांजरी सारखे प्राणी आता अनेक घरांमध्ये दिसू लागले आहेत. कुत्रा तर मानवाचा आधीपासूनचा मित्र म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी या प्राण्यांना आता कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. अशा मुक्या प्राण्यांना लळा लावला जात आहे. अशावेळी कुत्रे किंवा मांजर पाळताना त्यांचे आयुष्य कमी असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काय करायचे त्यांना कुठे दफन करायचे याचे प्रश्न मुंबई सारख्या मेट्रो शहरात आवासून उभे आहेत. कारण सुमारे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत प्राण्यांसाठी एकही सरकारी स्मशान भूमी नसल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे इलेक्ट्रीक शवदाहीनीत विधी करायचे तर त्यासाठी देखील मोठी प्रतिक्षा यादी असते. एवढंच काय परळचे पशू रुग्णालय वगळता मुंबई आणि परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एकही मोठे रुग्णालय नसल्याने मुक्या जीवांचे हाल होत आहेत. ...