बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र

| Updated on: May 28, 2020 | 5:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Sharad Pawar letter to PM Narendra Modi) पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे.

बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र
शरद पवार यांनी एकदा बाजार समित्यांमधील सुधारणांविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या बचावासाठी एपीएमसीच्या बदलांना प्रमोट करण्यात येत आहे.
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Sharad Pawar letter to PM Narendra Modi) पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी केंद्र सरकारला बांधकाम व्यवसायिकांना मदत करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना व्याजावर सूट देण्यात यावी किंवा आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रामार्फत केली आहे. गेल्या काही दिवसात पवारांनी मोदींना लिहिलेले हे चौथे पत्र आहे (Sharad Pawar letter to PM Narendra Modi).

शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. बांधकाम क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी स्वत: लक्ष देवून लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी मोदींना लॉकडाऊनदरम्यान चौथ्यांदा पत्र पाठवलं आहे. पहिल्या पत्रात (26 एप्रिल) ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत पवारांनी महाराष्ट्राला अतिरिक्त 1 लाख कोटी देण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या पत्रात (3 मे) शरद पवार यांनी ‘आयएफएससी’ केंद्र गांधीनगरमध्ये नेल्याने देशाचे आर्थिक नुकसान तर होईलच, मात्र मुंबईचे महत्त्व कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल, असा इशारा केंद्राला दिला होता.

तिसऱ्या पत्रात (15 मे) शरद पवार यांनी मोदींकडे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला सहा उपाय सुचवले होते.

संबंधित बातम्या :

अडचणीतील साखर क्षेत्राला आर्थिक मदत द्या, शरद पवारांनी पंतप्रधानांना सुचवले सहा उपाय

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र, 10 हजार 500 कोटींचा हप्ता थांबवण्याचीही मागणी