केंद्राचा ‘तो’ निर्णय अनुकूल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला शरद पवारांची साथ

| Updated on: Oct 02, 2020 | 4:43 PM

उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन कसे वागतात? कायद्याचं राज्य, मूलभूत अधिकार यावर तुमचा कवडीचा विश्वास नाही, असं दिसतं, असं पवारांनी नमूद केलं.

केंद्राचा तो निर्णय अनुकूल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला शरद पवारांची साथ
Follow us on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाचा अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. (Sharad Pawar on Modi Government and Ethanol Production)

पवार म्हणाले, “यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढलंय, त्यामुळं यावेळी आणि पुढील वर्षी या ऊसाचं गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्के साखर उत्पन्न कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आहे. केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण अनुकूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाला अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी धोरणाला विरोध

केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबत आम्हा लोकांची नाराजी आहे. आमच्या पेक्षाही पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जास्त नाराजी आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार जे सांगतंय की आम्ही बाजारपेठ खुली केलीये यामध्ये काही विशेष नाही. पण केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण याच्या उलट आहे, असं शरद पवार म्हणाले.

यूपीचा कायद्यावर कवडीचा विश्वास नाही

हाथरसमध्ये त्या युवती बरोबर बलात्कार झाला नाही, असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं ऐकलं. पण तिची हत्या तर झाली आहे. मग तिच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात का दिला नाही? उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन कसे वागतात? कायद्याचं राज्य, मूलभूत अधिकार यावर तुमचा कवडीचा विश्वास नाही, असं दिसतं, असं पवारांनी नमूद केलं. दुर्दैवाने महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे घडत असताना राज्य सरकाराची भूमिका ही फक्त बघ्याची आहे, असं पवार म्हणाले.

पवारांनी ‘सिरम’ची लस घेतली

सिरम इन्स्टिट्यूटची लस यायला जानेवारी उजाडेल. लोक म्हणतात मी कोरोनाची लस घेतली, पण ते खरं नाही. त्यांच्याकडे (सिरम) आता ‘आर बीसीजी ट्रिपल बुस्टर’ ही प्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ही मी आज घेतली, माझ्या स्टाफने घेतली आहे, असं पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले?, शरद पवारांचा सवाल

(Sharad Pawar on Modi Government and Ethanol Production)