Sharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले?, शरद पवारांचा सवाल

शरद पवार आज (29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले.

Sharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले?, शरद पवारांचा सवाल

पंढरपूर : अभिनेता सुशांत (Sushant) सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने (CBI) काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज (29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयला टोला लगावला. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले (Sharad Pawar Slams CBI over Sushant Singh Rajput Case).

दरम्यान, सुशांतची (Sushant) आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले होते. जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला (CBI) अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.

अनलॉकमध्ये काय काय सुरू करायचे ते आरोग्य खाते ठरवेल

यावेळी त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीवरदेखील भाष्य केले. अनलॉकबाबत बोलताना शरद पवारांनी, ‘काय काय सुरु करायचे ते आरोग्य खाते ठरवेल’, असे स्पष्ट केले आहे.

देश पातळीवर कृषी विधेयकाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत पवारांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्लाही शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला (Sharad Pawar Slams CBI over Sushant Singh Rajput Case).

संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेटीचा वेगळा अर्थ काढू नये

या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात देखील वक्तव्य केले. ‘संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊतांनी पहिली मुलाखात माझी घेतली. त्याच मुलाखातीत त्यांनी मला सांगितल की, पुढची मुलाखात मी उद्धव ठाकरे आणि नंतर भाजप नेत्यांची मुलाखात घेणार आहे’, असे पवारांनी स्पष्ट केले.

सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सगळ्या प्रकरणात पुढाकार घेत आहेत. याविशी बोलताना ‘केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणीही गंभीरतेने घेत नाही. राज्यसभेतही आणि बाहेरही त्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही’, असा टोला शरद पवारांनी लगावला. ‘महाविकास आघाडी’ सरकार स्थिर असून, या सरकारला  कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी (Sharad Pawar) या पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला.

(Sharad Pawar Slams CBI over Sushant Singh Rajput Case)

संबंधित बातम्या : 

Sharad Pawar | कंगनाला आपण अधिक महत्त्व देतोय, तिच्याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार

Sharad Pawar | डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI