‘अवनी’ मृत्यू प्रकरण : घटनास्थळावर नेऊन शार्पशूटरची चौकशी

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात ‘T-1’ (अवनी) वाघिणीला 2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता कंपार्टमेंट नंबर 149 मध्ये ठार करण्यात आले. अवनीला ठार केल्याच्या घटनेचा वन्यजीव प्रेमी आणि राजकीय नेत्यांनी निषेध केला. त्यामुळे अवनी वाघिणीच्या चौकशीसंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या वतीने सेवानिवृत्त कालेर, जोश, कांबळे अशी तीन सदस्य समिती आज जिल्ह्यात दाखल […]

'अवनी' मृत्यू प्रकरण : घटनास्थळावर नेऊन शार्पशूटरची चौकशी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात ‘T-1’ (अवनी) वाघिणीला 2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता कंपार्टमेंट नंबर 149 मध्ये ठार करण्यात आले. अवनीला ठार केल्याच्या घटनेचा वन्यजीव प्रेमी आणि राजकीय नेत्यांनी निषेध केला. त्यामुळे अवनी वाघिणीच्या चौकशीसंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या वतीने सेवानिवृत्त कालेर, जोश, कांबळे अशी तीन सदस्य समिती आज जिल्ह्यात दाखल झाली.

घटनास्थळावर नेऊन शार्पशूटरची चौकशी

या समितीने आज यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी गावाजवळील ज्या ठिकाणी वाघिणीला ठार करण्यात आले, त्या घटनास्थळाची पाहणी केली. नवाब शहाफत अली खान यांचा सुपुत्र अजगर अली आणि यांच्यासोबत असलेल्या तिघांनी या वाघिणीला ठार केले. त्यांचीसुद्धा घटनास्थळावर चौकशी करण्यात आली. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची बाजू नोंदवण्यात आली. वनविभागाच्या आदेशानुसार, या वाघिणीला पहिले ट्रेन क्यू लाईज्  करण्यात आले की नाही की थेट गोळ्या घालण्यात आल्या, या संदर्भात सखोल तपासणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी ज्यावेळी  वाघिणीला ठार करण्यात आली असा प्रात्यक्षिक सुद्धा निर्माण करण्यात आला.

कागदपत्र आणि पंचनाम्याची पडताळणी

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीमध्ये कालेर, सेवानिवृत्त अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जोश, कामडी यांचा समावेश आहे. थेट दिल्लीहून पांढरकवडा येथे दाखल झाल्यानंतर थेट बोराडी जवळील T1 वाघिणीला ठार करण्यात आलेल्या घटना स्थळावर दुपारी एक वाजता जाऊन चौकशीला सुरुवात केली. ही चौकशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत याच घटनास्थळावर सुरू होती. त्याचबरोबर लोणी येथील बेसकॅम्पवर येऊन त्यांनी आतापर्यंतच्या सर्व कागदपत्रांची पंचनाम्याची सर्व रेकॉर्ड यांची पडताळणी सुरू केली आहे. तसेच राज्य शासनानेही या प्रकरणात चार सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली असून तेही लवकरच या बोराटे गावी दाखल होणार असल्याचेही वन विभागाने सांगितले.

VIDEO : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची माहिती :

सर्वोच्च न्यायालयाने 11 सप्टेंबर रोजी वाघिणीला ट्रकुलाईझ  करावा ठार करा असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार वन विभागाने ही मोहीम राबविण्यात आली. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता सुमारास या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी ही समिती असून सर्व घटने चा अहवाल सादर केला जाणार असून अहवाल सादर केल्या नंतर सत्य काय ते पुढे येणार आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.