दिल्ली ते कोलंबो व्हाया रामेश्वरम, श्री रामायण एक्सप्रेस राजधानीतून रवाना

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

नवी दिल्ली : दोन वर्ष पूर्वी घोषणा केलेली रामायण एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आली. भारतातील तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वेकडून श्री रामायण एक्सप्रेस चालू करण्यात आली आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून ही ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन तुम्हाला कमी दरात भारतीय तीर्थस्थळांचं दर्शन देणार आहे. ‘श्री रामायण एक्सप्रेस’ ट्रेनचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं. दिल्लीवरुन सुटलेली ही ट्रेन […]

दिल्ली ते कोलंबो व्हाया रामेश्वरम, श्री रामायण एक्सप्रेस राजधानीतून रवाना
Follow us on

नवी दिल्ली : दोन वर्ष पूर्वी घोषणा केलेली रामायण एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आली. भारतातील तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वेकडून श्री रामायण एक्सप्रेस चालू करण्यात आली आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून ही ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन तुम्हाला कमी दरात भारतीय तीर्थस्थळांचं दर्शन देणार आहे. ‘श्री रामायण एक्सप्रेस’ ट्रेनचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं. दिल्लीवरुन सुटलेली ही ट्रेन श्रीलंकेपर्यंतच्या सर्व श्री राम यांच्या पवित्र तीर्थस्थळांना भेट देणार आहे. 16 दिवसांच्या प्रवासात भारतीयांना रामायणासंबधित जोडलेल्या प्रत्येक तीर्थस्थळांना कमी पैशात भेटही देता येणार आहे.

कसा असेल प्रवास?

दोन टप्प्यात प्रवास होणार आहे. पहिला भारत आणि दुसरा श्रीलंका, दिल्लीवरुन सुटल्यावर ट्रेनचा पहिला थांबा हा अयोध्या असून त्यानंतर हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर येथे ही ट्रेन थांबणार आहे. रामायणाच्या संबधित सर्व महत्त्वाच्या स्थळांवर जसे की नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृगंपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम यांसारख्या स्थळांना भेट देणार आहे.

ट्रेन आपला प्रवास तामिळनाडू ते रामेश्वरम येथे जाऊन 16 दिवसांचा प्रवास पूर्ण करेल. तर श्रीलंकेचा प्रवास हा चेन्नई ते कोलंबोपर्यंत असणार आहे. यामध्ये कँडी, नुवारा एलिया, कोलंबो आणि नेगोंबो सारख्या चार ठिकाणी भेट दिली जाईल. हा प्रवास एकूण पाच रात्री आणि सहा दिवसांचा आहे.

प्रवासात जेवण आणि राहण्याची व्यवस्था

IRCTC च्या माहितीनुसार ट्रेनमध्ये जेवण, राहणे आणि अंघोळीची व्यवस्था आहे. तसेच धर्मशाळेतही राहण्याची व्यवस्था असणार आहे. या संपूर्ण प्रवासात IRCTC चे व्यवस्थापकही प्रवाशांसोबत असतील.

प्रवासी भाडे आणि दर

रामायण एक्सप्रेसमध्ये एकावेळी कमीत कमी 800 प्रवासी प्रवास करु शकतील. एका व्यक्तीचे भाडे 15 हजार 120 रुपये आहे. तर श्रीलंकेच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून वेगळे पैसे आकारले जातील. श्रीलंकेच्या दौऱ्याला जाण्यासाठी प्रवासी चेन्नई ते कोलंबोपर्यंत प्रवास करू शकतील. पॅकेजी किंमत प्रति व्यक्ती 36 हजार 970 रुपये आहे.

IRCTC ने नुकतेच 28 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत एका टूरसाठी एसी टूरीस्ट ट्रेन चालवली होती. ही ट्रेन त्रिवेंद्रमच्या रामायणासंबधित स्थळ पंचवटी, चित्रकूट, श्रिंगवेरपूर, तुलसी मानस मंदिर, दरभंगा, सीतामढी, अयोध्या आणि रामेश्वरमपर्यंत चालवण्यात आली होती.