
मुंबई : देशात अनेक राजघराणी अजूनही नांदत आहेत. जेव्हा 1948 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात 565 संस्थाने होती. मात्र, त्या संस्थानात एका महत्वाचे घराणे कुठेच नव्हते. हे घराणे म्हणजे भारतावर तब्बल 330 वर्षाहून अधिक काळ राज्य करणारे मुघल घराणे. महाराष्ट्रात पहायला गेल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्थापन झालेल्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही राजघराण्यांना अजूनही मान मिळत आहे. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर यांची राजघराणीही अजून टिकून आहेत. इंदोर, ग्वाल्हेर येथे त्यांची स्वतःची सत्ता आहे. त्यांना मानमरातब मिळत आहे. मुघलांनी उत्तर भारतात अनेक शहरे वसविली. लाल किल्ला, ताजमहाल सारख्या वास्तू त्यांनी उभ्या केल्या. मुघल घराण्याला एक प्रचंड मोठा असा इतिहास आहे. पण, त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत? ते काय करतात? त्यांची परिस्थिती कशी आहे? त्याचे कारण काय? हलाखीचे जीवन जगण्याची, कधी काळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या मुघल घराण्यातील वंशजांवर पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो यावरूनच त्या घराण्याची किती वाताहत झाली आहे याची कल्पना येते. ...