सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण

| Updated on: Feb 25, 2020 | 1:29 PM

स्वाईन फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील वकिलांना लसी उपलब्ध करुन दिल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला

सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण
Follow us on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी मंगळवारी कोर्टात यासंदर्भात माहिती दिली. सहा न्यायाधीशांना एच1एन1 विषाणूची (H1N1) लागण झाल्याने उपाययोजना करण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी सरन्यायाधीशींसोबत बैठक घेतली. (six judges of supreme court swine flu)

‘सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या व्यक्तींचं लसीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत’ असं आवाहन सरन्यायाधीश शरद बोबडे यांना केल्याचं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं.

स्वाईन फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील वकिलांना लसी उपलब्ध करुन दिल्या जातील, असा निर्णय घेण्यात आल्याचंही न्यायमूर्तींनी सांगितलं. स्वाईन फ्लूसारख्या आपत्कालीन परिस्थितीची काळजी घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती सरन्यायाधीशांना करण्यात आली आहे. (six judges of supreme court swine flu)

स्वाईन फ्लू म्हणजे काय?

स्वाईन फ्लूलाच स्वाईन इन्फ्लुएन्झा, एच1एन1 फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरुप धारण करतात. या तापाचे इन्फ्लुएन्झा ‘ए’ आणि इन्फ्लुएन्झा ‘सी’ असे दोन प्रकार आहेत.

इन्फ्लुएन्झा ‘ए’चे एच1एन1, एच1एन2, एच3एन1, एच3एन2 आणि एच2एन3 असे प्रकार आहेत. स्वाईन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. निरोगी शरीर कोणत्याही आजारपणास अटकाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी आपलं शरीर तणावमुक्त असणं गरजेचं आहे. कारण तणावामुळेही शरीर यंत्रणा कमकुवत बनू शकते. (संदर्भ : विकासपीडिया)

six judges of supreme court swine flu

हेही वाचाराज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रातील 7 तर देशातील 55 जागांसाठी मतदान