हम्पीला निघालेल्या मुंबईकरांचा भीषण अपघात, 6 जण ठार
धारवाड (कर्नाटक) : ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात मुंबईच्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी आहेत. धारवाड जिल्ह्यातील अन्नईगेरी तालुक्यात भाद्रपूर इथं ही भीषण दुर्घटना घडली. जखमींवर हुबळीतील किम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत सर्व भाविक मुंबईपासून हम्पीपर्यंत तीर्थयात्रेला निघाले होते. बंगलोरमधील कथयनी ट्रॅव्हल्समधून सर्वजण प्रवास करत होते. त्यावेळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची […]

धारवाड (कर्नाटक) : ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात मुंबईच्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी आहेत. धारवाड जिल्ह्यातील अन्नईगेरी तालुक्यात भाद्रपूर इथं ही भीषण दुर्घटना घडली. जखमींवर हुबळीतील किम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत
सर्व भाविक मुंबईपासून हम्पीपर्यंत तीर्थयात्रेला निघाले होते. बंगलोरमधील कथयनी ट्रॅव्हल्समधून सर्वजण प्रवास करत होते. त्यावेळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची धडक होऊन भीषण दुर्घटना झाली. प्रवासी हंपीला जात होते त्यावेळी हुबळी आणि अन्नईगेरी दरम्यान हा अपघात घडला.
अपघातातील मृतांची नावे
विश्वनाथ (75)
दिनकर (74)
रमेश जयपाल (70)
सुमेधा (65)
लाऊ (65)
सुचित (65)
Non Stop LIVE Update