Solapur | मराठा बांधवांसाठी सोलापुरात मोर्चा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

सोलापुरात मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

आज सोलापुरात मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र कोव्हीडच्या  पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी  ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्यात आली आहेत. सोलापूर शहरात दोन हजार तर ग्रामीण भागात दोन हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Solapur Maratha Morcha police force deployed)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI