सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी

दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा त्यांनी जिल्हा दौरा केला होता. (Solapur Guardian Minister Jitendra Awhad)

सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी
| Updated on: Mar 31, 2020 | 3:40 PM

मुंबई : सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. (Solapur Guardian Minister Jitendra Awhad)

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदं वाटून देण्यात आली होती. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

वळसे पाटील पालकमंत्रिपदाबाबत फार इच्छुक नव्हते. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा त्यांनी जिल्हा दौरा केला होता.

जितेंद्र आव्हाड यांना आधी कॅबिनेट मंत्रिपद दिले होते, पण पालकमंत्री पदाची जबाबदारी नव्हती. आता आव्हाडांकडे सोलापूरची जबाबदारी आली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. यावेळी राज्य शासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. यावर आपल्याला एकाही महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

(Solapur Guardian Minister Jitendra Awhad)