
कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे पाहायला मिळते. त्या कार्यक्रमात अधिक कॉमेडी (Comedy)असल्यामुळे तो शो कमी कालावधीत लोकांच्या पसंतीला अधिक पडला आहे. तिथं दर आठवड्याला बॉलीवूडचा कलाकार (Bollywood) पाहूणा म्हणून जातो.
प्रत्येकवेळी कपिल शर्माच्या कार्यक्रमात नव्या पाहूण्यांना बोलावलं जातं. त्याचबरोबर वैयक्तीक आयुष्याबाबत देखील चर्चा केली जाते. आत्तापर्यंत कपीलच्या कार्यक्रमात राजकीय, कलाकार, खेळाडू त्याचबरोबर अन्य क्षेत्रातील मान्यवर लोकांनी उपस्थिती लावली आहे.
प्रत्येकवेळी नव्या पाहुण्याकडून नवा खुलासा करणं ही कपिल शर्माच्या कार्यक्रमाची खासियत आहे.
भारताची बॅडमिंटन स्टार आणि 2016 ची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूने रौप्य पदक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने तिला एक महागडी भेट दिल्याचा खुलासा केला आहे.
सचिन तेंडूलकर पीव्ही सिंधूला एक महागडी वस्तू देण्याचं आश्वासन दिलं होतं. तेंडुलकर यांनी पूर्ण असंही सांगितलं.
ज्यावेळी स्पर्धा सुरु होणार होती, त्यावेळी सचिनने मला मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर पदक जिंकल्यानंतर माझ्याकडून एक महागडी कार मिळेल असंही सांगितलं होतं. ते आश्वासन तेंडूलकरने पुर्ण केलं.
सचिन तेंडूलकरने विरेंद्र सेहवागला सुध्दा महागडी कार दिल्याचं सेहवागने जाहीरपणे टीव्हीच्या एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते.