भारत-पाकिस्तान सीमेवर शेतीचे अनोखे प्रयोग, शेतकऱ्यांच्या दिमतीला सैन्याकडून बुलेटफ्रूफ ट्रॅक्टर

| Updated on: Sep 20, 2020 | 11:49 PM

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर कायम तणावचे ढग पाहायला मिळत आहेत. या दोघांना उत्तर म्हणून भारतीय वीरांनीही दोन्ही बाजूंवर मोर्चे उघडले आहेत (India Pakistan border Farming with Bulletproof Tractor).

भारत-पाकिस्तान सीमेवर शेतीचे अनोखे प्रयोग, शेतकऱ्यांच्या दिमतीला सैन्याकडून बुलेटफ्रूफ ट्रॅक्टर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत. एकीकडे एलओसीवर पाकिस्तान गोळीबार करत आहे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बॉर्डरवरही कायम तणावचे ढग पाहायला मिळत आहेत. या दोघांना उत्तर म्हणून भारतीय वीरांनीही दोन्ही बाजूंवर मोर्चे उघडले आहेत (India Pakistan border Farming with Bulletproof Tractor). ते पाहून पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्ताननं पाळलेल्या दहशतवाद्यांचे सारे प्लॅन कागदांवरच शिल्लक राहतायत.

एलओसीपासून आयसी म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरपर्यंत भारतीय सेनेनं नवं जाळं उभं केलंय. जे मागच्या अनेक दशकांमध्ये झालेलं नव्हतं, ते सध्या भारत-पाकिस्तानच्या सीमेवर होतंय. कठुआ जिल्ह्यातल्या ज्या भागात तार कम्पाऊंडची सीमा आहे त्याच कम्पाऊंडला लागून आता चक्क शेती होतेय. जिथं काल-परवापर्यंत लोकांना जाणं सुद्धा शक्य नव्हतं, तिथं आता काश्मिरी जनतेनं नांगरणी, पेरणी सुरु केलीय. आंतरराष्ट्रीय सीमेवर असणाऱ्या हिरानगर सेक्टरमध्ये ही सर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं तब्बल 18 वर्षानंतर शेतात ट्रॅक्टर चालतो आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शेतात चालणारे हे ट्रॅक्टर साधेसुधे नसून सर्वच्या सर्व ट्रॅक्टर बुलेटप्रूफ आहेत.

सीमेवरील या भागात अलीकडे शेतकरी जमीन कसतोय आणि पलीकडे त्या शेतकऱ्याला सैन्याकडून संरक्षण दिलं जातंय. मागचे 2 दशकं इथं शेतकरी शेती करु शकत नव्हता. हिरानगर सेक्टरची हजारो एकर जमीन पडून होती. 18 वर्ष पीक न घेतल्यामुळे जमिनीवर झाडं-झुडपांचं साम्राज्य होतं. मात्र बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनानं पुढाकार घेतला आणि सध्या इंटरनॅशनल बॉर्डरला लागून असलेली शेती सैन्याच्या संरक्षणात कसली जातेय.

सीमेवर तैनात भारतीय सैन्याचं हे अनोखं काम शेकडो शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी नवी उमेद देणारं आहे. भारतीय सैन्य आपल्या शेतकऱ्यांच्या हातात बुलेटप्रूफ ट्रॅक्टर देईल आणि शिवाय शेतीसाठी संरक्षणही पुरवेल, याची पाकिस्ताननं स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती.

भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर इतकी सुरक्षा का आहे या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानच्या कुरघोड्यांमध्ये आहे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या अंधारात इथं अनेकदा पाकिस्तानी ड्रोन टेहळणीसाठी पाठवले जातात. मात्र जेव्हापासून इथं सैन्य अलर्ट झालंय तेव्हापासून पाकिस्तानचा एकही नापाक मनसुबा यशस्वी झालेला नाही. 90 च्या दशकात जेव्हा खलिस्तानचं आंदोलन चर्चेत होतं तेव्हा सुद्धा पंजाब पोलिसांनी बुलेटप्रूफ ट्रॅक्टर बनवले होते. याच ट्रॅक्टरर्सच्या मदतीनं ऊसाच्या शेतीत लपलेल्या अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.

बीएसएफनं घेतलेल्या या पुढाकारमुळे हिरानगर सेक्टरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बीएसएफचे जवान फक्त देशच नाही, तर सीमेवरच्या शेतीचं आणि शेतकऱ्याचंही संरक्षण करतायत. जय जवान आणि जय किसान हा नारा आंतरराष्ट्रीय सीमेवर खऱ्या अर्थानं सार्थकी ठरतोय.

संबंधित बातम्या :

पंजाब सीमेवर बीएसएफच्या जवानांची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच घुसखोरांना कंठस्नान

शरीरावर लाल निशाणी, पायात कोडिंग रिंग, भारत-पाक सीमेवर संशयित स्पाय कबूतर

India Pakistan border Farming with Bulletproof Tractor