पंजाब सीमेवर बीएसएफच्या जवानांची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच घुसखोरांना कंठस्नान

पंजाब सीमेवर बीएसएफच्या जवानांची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच घुसखोरांना कंठस्नान

भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांना कंठस्नान घातलं आहे (BSF Jawan shoots down five intruders).

चेतन पाटील

|

Aug 22, 2020 | 12:40 PM

चंदिगढ : भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांना कंठस्नान घातलं आहे. पंजाबच्या तरन तारन येथील सीमाभागात जवानांनी ही कारवाई केली आहे. सध्या आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे (BSF Jawan shoots down five intruders).

बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांना पहाटे सीमाभागात काही संशयास्पद घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर जवानांनी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास गोळीबाळाला सुरुवात केली. या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले आहेत (BSF Jawan shoots down five intruders). जवानांना घुसखोरांकडून एक AK 47 आणि दोन पिस्तूल मिळाल्या आहेत.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लात एका दहशतवाद्याला कंठस्नान

दरम्यान, जम्मू-काश्मीकमधील बारामुल्ला जिल्ह्यात जवान आणि अतिरेक्यांमध्ये सध्या चकमक सुरु आहे. गुप्तर यंत्रांनी सुरक्षादलांना बारामुल्ला भागात अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. सुरक्षा दलांनी चारही बाजूंनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेला गोळीबार सुरु केला. या चकमकीत आतापर्यंत एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.

हेही वाचा : दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें