SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!

| Updated on: Jul 29, 2020 | 7:03 PM

बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथल्या मजुराच्या मुलाने दहावीच्या परिक्षेत सर्वच विषयात 35 गुण घेतले.

SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!
Follow us on

बीड : दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर आज झाला (SSC Board Exam Result 2020). यामध्ये बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथल्या मजुराच्या मुलाने दहावीच्या परिक्षेत सर्वच विषयात 35 गुण घेतले. त्यामुळे बीडच्या या पठ्ठ्याची एकच चर्चा रंगली आहे. धनंजय नखाते असं विद्यार्थ्याचे नाव असून तो माजलगाव इथल्या उमरी गावाचा रहिवासी आहे (SSC Board Exam Result 2020).

सर्वच विषयात 35 मार्क घेणारा धनंजय जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 35 मार्क घेऊन देखील धनंजय नखाते याने चर्चेतून गावाचे नाव मोठं केल्याने, गावकऱ्यांनी त्याचं अनोखं स्वागत करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दहावीचा निकाल जाहीर

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत (SSC Board Exam Result 2020).

विभागनिहाय टक्केवारी

  • कोकण – 98.77 टक्के
  • पुणे – 97.34 टक्के
  • कोल्हापूर – 97.64 टक्के
  • मुंबई – 96.72 टक्के
  • अमरावती – 95.14 टक्के
  • नागपूर – 93.84 टक्के
  • नाशिक – 93.73 टक्के
  • लातूर – 93.09 टक्के
  • औरंगाबाद – 92 टक्के

SSC Board Exam Result 2020

संबंधित बातम्या :

SSC Results : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी, बोर्डाची पत्रकार परिषद