दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनोखी उपाययोजना

| Updated on: May 12, 2020 | 7:22 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारु खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे (e-token facility for liquor purchase).

दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनोखी उपाययोजना
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हायटेक फंडा शोधला आहे (e-token facility for liquor purchase). राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. वाईन शॉप्समध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही उपायोजना करण्यात आली आहे. या हायटेक उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास टळणार आहे (e-token facility for liquor purchase).

मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे.

या संकेत स्थळावर ग्राहकाने सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल.

आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर सदर टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधित दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.