सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी […]

सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई
Follow us on

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी एका शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा जावईशोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व सरकारने लावला आहे. नाशिक येथील एका शेतकऱ्याला त्याचे 40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्रात झालेल्या नुकसानी पोटी 5 हजार तर वर्धा येथील एका शेतकऱ्याला त्याचे 5 गुंठे क्षेत्रात झालेल्या नुकसानीपोटी 1 हजार नुकसान भरपाई जाहीर केली आहे . प्रत्यक्षात राज्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते .

राज्यातील एकूण 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार 195 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून 6 हजार 834 हेकटर क्षेत्रावर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील 25 तर मे महिन्यात राज्यातील 13 जिल्ह्यातील पिके व फळपिकांचे नुकसान झाले असून राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने 18 डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे .

बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी मदत अनुज्ञेय असणार आहे . पिकांच्या नुकसानीकरीता आलेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .

सरकारी आकडेवारी पाहता अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला असेच म्हणावे लागेल, अधिकारी व सरकारने हा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला हे प्रश्नचिन्ह आहे

नुकसान भरपाईची विभागनिहाय आकडेवारी :

  • राज्यातील 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार नुकसान भरपाई
  • नागपूर विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 24 लाख
  • अमरावती विभागातील 856 शेतकऱ्यांना 574.66 हेकटर क्षेत्रासाठी 79 लाख 93 हजार
  • औरंगाबाद विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 45 लाख
  • नाशिक विभागातील 1899 शेतकऱ्यांना 659.70 हेकटर क्षेत्रासाठी 97 लाख 35 हजार
  • पुणे विभागातील 4773 शेतकऱ्यांना 2101.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 52 लाख
  • कोकण विभागातील 3382 शेतकऱ्यांना 991.31 हेकटर क्षेत्रासाठी 2 कोटी 7 लाख