सनी लिओनी बॉलिवूडनंतर आता नेपाळी चित्रपटात

बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आता नव्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. सध्या सनी लिओनी दाक्षिणात्य फिल्ममध्ये व्यस्त आहे.

सनी लिओनी बॉलिवूडनंतर आता नेपाळी चित्रपटात
| Edited By: | Updated on: Jun 14, 2019 | 10:31 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आता नव्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. सध्या सनी लिओनी दाक्षिणात्य फिल्ममध्ये व्यस्त आहे. याशिवाय सनी लवकरच नेपाळी सिनेमामध्येही आपल्या करिअरची सुरुवात करत आहे. सनीने ट्वीट करत आपल्या नव्या नेपाली सिनेमा ‘पासवर्ड’चे गाणं शेअर केलं आहे.

सनीने ट्वीटमध्ये म्हटलं, “मी माझ्या नेपाळी सिनेमा ‘पासवर्ड’चे गाणं तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी खूप खूश आहे. अनेकजणांना माझ्या नेपाळ प्रेमाबद्दल माहीत असेल. यामुळेच मी नेपाळी सिनेमाचा एक भाग बनली. मला खूप अभिमान आहे. नेपाळमधून खूप टॅलेंट समोर येत आहे”.

सनी आपल्या येणाऱ्या नव्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘कोकोकोला’साठी तयारी करत आहे आणि आपल्या भूमिकेसाठी ती उत्तर प्रदेशची स्थानिक भाषाही शिकत आहे. सिनेमाची स्क्रिप्ट उत्तर प्रदेशवर आधारीत आहे. यासाठी सनी तेथील स्थानिक भाषा शिकत आहे. सनी या सिनेमाशिवाय साऊथ इंडियन सिनेमा ‘रंगीला’ आणि ‘वीरम देवी’मध्येही दिसणार आहे.

“जेव्हा माझ्या कामाबद्दल बोललं जाते तेव्हा मी नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी प्रयत्न करते. मग ती एखादी भाषा शिकण्याचे काम असले तरी मी शिकते. यामुळे कलाकार म्हणून स्वत:ला विकसीत होण्यासाठी मला मदत होते. कामच्यावेळी अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. मी एक नवीन बोली भाषा शिकत आहे आणि व्यवस्थित बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत आह”, असं सनीने एका मुलाखतीमध्ये सांगितले.