दुग्धजन्य पदार्थावरील GST कमी करा, प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्या, स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

| Updated on: Aug 24, 2020 | 4:44 PM

दुधाला योग्य भाव अणि प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

दुग्धजन्य पदार्थावरील GST कमी करा, प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्या, स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Follow us on

सातारा : दुधाला योग्य भाव अणि प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी (Swabhimani Shetkari Sanghtna Morcha For Milk Rates) आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. दूध दराबाबत झालेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर खरमरीत टीका केली (Swabhimani Shetkari Sanghtna Morcha For Milk Rates).

लॉकडाऊन घोषित केल्यामुळे दुधाचा 40 टक्के खप कमी झाला. यामुळे अतिरिक्त दूध तयार झालं, त्याला सबसिडी मिळावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. “दुग्धजन्य पदार्थावरील GST कर कमी करावेत आणि राज्य सरकारने लिटरला 5 रुपये अनुदान द्यावे”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

“महाराष्ट्रात 46 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे. मोर्चाची मालिका संपल्यानंतर निर्णायक लढ्याला सुरुवात करणार ही आमची पोकळ धमकी नाही”, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

“दूध दर निर्णयाच्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले. मुख्यमंत्री फक्त पत्राद्वारे भेटतात. समक्ष भेटत नाहीत”, अशी टीका राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंवर केली (Swabhimani Shetkari Sanghtna Morcha For Milk Rates).

“दुधाच्या प्रश्नावर आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला गुढघे टेकायला लावू. दूध आमच्या घरात आहे, लेकरं-बाळ तुमच्या घरात आहेत. ही आमची पोकळ धमकी नाही”, असा इशारा राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

Swabhimani Shetkari Sanghtna Morcha For Milk Rates

संबंधित बातम्या :

झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल