अनलॉक : ताजमहाल प्रदूषणाच्या विळख्यात, प्रदूषित शहरांच्या यादीत आग्रा 9 व्या क्रमांकावर

| Updated on: Oct 15, 2020 | 5:57 PM

अनलॉक झाल्यानंतर थोड्याच दिवसात आग्रा शहरातील प्रदूषण वाढलं आहे. आग्रा येथील ताजमहाल परिसरातील हवेत धूळ आणि विषारी गॅसचे प्रमाण वाढलं आहे.

अनलॉक : ताजमहाल प्रदूषणाच्या विळख्यात, प्रदूषित शहरांच्या यादीत आग्रा 9 व्या क्रमांकावर
सिमेंटच्या शोधाआधी 'ताजमहल'मध्ये दगड कसे बसविले?;
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले होते. मात्र, अनलॉक अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत तसे प्रदूषणात वाढ झाली आहे. अनलॉक झाल्यानंतर थोड्याच दिवसात आग्रा शहरातील प्रदूषण वाढलं आहे. आग्रा येथील ताजमहाल परिसरातील हवेत धूळ आणि विषारी गॅसचे प्रमाण वाढलं आहे. (Taj Mahal covered by dust  after few months of Unlock)

वायू प्रदूषणाची स्थिती भयानक झाली आहे. लोकांना श्वास घ्यायला देखील त्रास होत असल्याची माहिती आशिष सिंह या स्थानिक व्यक्तीनं दिली आहे. हवेतील वाढत्या धुळीच्या प्रमाणाकडे प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याचेही त्यांनी ANI या वृ्त्त संस्थेशी बोलताना सांगितले.

आग्रा देशातील प्रदूषित शहरांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. शहरात सर्व ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेताना त्रास होत असल्याचं गौरव गुप्ता या व्यक्तीनं म्हटलं आहे.

ताजमहाल परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करण्यात आहे. ताजमहाल परिसरातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्मारक सुरक्षा समितीचे अध्यक्ष सईद मुन्नवर यांनी सांगितले. शहरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रदुषण रोखण्याच्या सूचना देण्याच आल्या आहेत.

ताजमहालाचे सौंदर्य वाचवण्याबरोबर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुन्नवर यांनी दिली. इलेक्ट्रिक बसमधून प्रदूषण होणार नाही आणि ताजमहालाच्या संगमरवराला बाधा पोहोचणार नाही, असेही मुन्नवर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या: 

गाईडलाईन तयार होताच सिनेमागृहे सुरु करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

‘लिटिल मोअर’ला नो मोअर चान्स! ऑनलाईन परीक्षा घोळामुळे मुंबई विद्यापीठाने काम काढून घेतलं!

(Taj Mahal covered by dust  after few months of Unlock)