AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | ससून रुग्णालयाच्या 11 मजली इमारतीचं Covid 19 हॉस्पिटलमध्ये रुपांतर, देवस्थानांची कोटींची मदत

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यभरातील देवस्थानांकडून (Temple Trust Help) ससून रुग्णालयाला आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

Corona | ससून रुग्णालयाच्या 11 मजली इमारतीचं Covid 19 हॉस्पिटलमध्ये रुपांतर, देवस्थानांची कोटींची मदत
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 01, 2020 | 9:05 PM
Share

पुणे : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यभरातील देवस्थानांकडून (Temple Trust Help) ससून रुग्णालयाला आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सरकारने ससून रुग्णालयातील अकरा मजली ईमारतीचं कोविड-19 हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी देवस्थानकडून तीन दिवसात एक कोटीहून (Temple Trust Help) अधिक निधी जमा करण्यात आला आहे.

धर्मदाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी पुणे विभागातील सर्व देवस्थानांना आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केलं होते. त्यानंतर देवस्थानांनी मोठ्या प्रमाणात मदत देऊ केली. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून बारा लाखाचं व्हेंटिलेटर, जेजुरी मार्तंड देवस्थान कडून 51 लाख रुपये, गोंदवलेकर महाराज देवस्थान कडून 25 लाख रुपये, चिंचवड देवस्थान कडून 21 लाख रुपये, शंकर महाराज मठाकडून 5 लाख रुपये (Temple Trust Help), श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान कुठून 2 लाख 51 हजार, तर सोलापूर बाहेती यांनी 10 लाखाचं टायझर उपलब्ध करुन दिलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा गुणाकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे. पुणे विभागातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात कोरोनाबाधित 36 रुग्ण आहेत. तर पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि कोल्हापूर 2 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे विभागातून आतापर्यंत 1633 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1,529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1,413 नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर 77 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167 पुणे – 38 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 9 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 9 वसई विरार – 6 यवतमाळ – 4 बुलडाणा – 3 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 320

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

Temple Trust Help

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?