ज्या रंगाच्या ‘पगड्या’ त्या रंगाच्या ‘रोल्स रॉयस’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

लंडन : एका पगडीधारी उद्योजकाने 50 कोटी खर्च करुन 6 रोल्स रॉयस कार खरेदी केल्या आहेत. यासाठी रोल्स रॉयसचे सीईओ टॉटर्स्टन स्वत: रुबेन सिंगला कार डिलीव्हरी देण्यासाठी पोहोचले. रुबेनकडे आता 20 रोल्स रॉयस कार आहेत. आपल्या खास ग्राहकाचा सन्मान करण्यासाठी रोल्स रॉयसचे सीईओ यांनी हे पाऊल उचललं आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे सिख उद्योजक रुबेन […]

ज्या रंगाच्या ‘पगड्या’ त्या रंगाच्या ‘रोल्स रॉयस
Follow us on

लंडन : एका पगडीधारी उद्योजकाने 50 कोटी खर्च करुन 6 रोल्स रॉयस कार खरेदी केल्या आहेत. यासाठी रोल्स रॉयसचे सीईओ टॉटर्स्टन स्वत: रुबेन सिंगला कार डिलीव्हरी देण्यासाठी पोहोचले. रुबेनकडे आता 20 रोल्स रॉयस कार आहेत. आपल्या खास ग्राहकाचा सन्मान करण्यासाठी रोल्स रॉयसचे सीईओ यांनी हे पाऊल उचललं आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे सिख उद्योजक रुबेन सिंग यांनी तब्बल 20 पेक्षा अधिक महागड्या कार खरेदी केल्या आहेत. त्यांच्या कारच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस, कलिनन आणि इतर कारचा समावेश आहे. ब्रिटीश रोल्स रॉयसला राजेशाही सवारीची कार समजत होते आणि सिंग यांनी या कार खरेदी करत पगडीधारी कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं आहे.

रुबेन सिंग सध्या सोशल मीडियावर आपल्या कारमुळे प्रसिद्ध आहेत. कारण त्यांनी एक-दोन नाही, तर 6 रोल्स रॉयस आणि 14 इतर महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र यामागे एक विशेष कारण आहे. त्यांनी या सर्व कार आवड म्हणून नाही, तर ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी खरोदी केल्या आहेत.

1990 च्या दशकात रुबेन सिंग यांचा ईंग्लंडमध्ये कपड्यांचा व्यवसाय होता, जो त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी सुरु केलेला. त्यावेळी त्यांचा ब्रँड ब्रिटनमधील एक प्रसिद्ध ब्रँड होता. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना 2007 मध्ये त्यांना खूप मोठा तोटा झाला. यामुळे त्यांना आपला कपड्यांचा व्यवसाय बंद करावा लागला. याच दरम्यान त्यांच्या पगडीचा अपमान एका ब्रिटीश उद्योजकाने केला. तो म्हटला की, तुम्ही फक्त रंगी-बेरंगी पगड्या घालू शकता. ही गोष्ट रुबेनच्या मनाला लागली आणि त्यामुळे रुबेनने पुन्हा आपला व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.

रुबेनने ब्रिटीश उद्योजकाला आव्हान दिलं की, मी जेवढ्या रंगाच्या पगड्या घालेन तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस मी खरेदी करेन. यानंतर त्याने हे चॅलेंज खरं करुन दाखवत कमाल केली. शेवटी रुबेनने आपला व्यवसाय पुन्हा उभा करत एक नाही तर तब्बल सहा रोल्स रॉयस कार खरेदी केल्या, ज्या त्यांच्या पगडीच्या रंगाच्या आहेत. याशिवया त्यांनी इतर काही महागड्या गाड्याही खरेदी केल्या आहेत.

आज रुबेन ऑलडेपा कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचे काम अनेक देशांमध्ये पसरले आहे. त्यांना ब्रिटिश बिल गेट्सच्या नावाने ओळखलं जातं. तर त्यांना ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी गवर्नमेंटच्या सल्लागार कमिटीवर सदस्यही केले आहे.