रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा प्रयत्न, रेल्वेने तिघांना उडवले

चंदीगड : तीन मुलांना रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं जीवावर बेतलं आहे. ही घटना हरियाणाच्या पानीपत येथील आहे. तीन तरुण पानीपत पार्कजवळ रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढत होते, यावेळी मागून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. चमन, सनी आणि किशन अशी मृत झालेल्या तरुणांची नावं आहेत. या भीषण अपघाताने पानीपतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपघात झाल्यानंतर जखमी […]

रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा प्रयत्न, रेल्वेने तिघांना उडवले
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

चंदीगड : तीन मुलांना रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं जीवावर बेतलं आहे. ही घटना हरियाणाच्या पानीपत येथील आहे. तीन तरुण पानीपत पार्कजवळ रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढत होते, यावेळी मागून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. चमन, सनी आणि किशन अशी मृत झालेल्या तरुणांची नावं आहेत. या भीषण अपघाताने पानीपतमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने रेल्वे पोलिसांनी तिघांना रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाला होता.

हे तिघेही उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील रहिवासी आहेत. आपल्या एका नावतेवाईकाच्या लग्नासाठी ते पानीपत येथे आले होते. यांच्यासोबत त्यांच्या एक मित्र दिनेशही होता. यातील चौथा मित्र दिनेशने रेल्वे येताच ट्रॅकमधून बाहेर येत आपला जीव वाचवला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला.

“हे चौघेजण बराचवेळ रेल्वे ट्रॅकवर फिरत होते. यावेळी ते एकमेकांचे फोटोही काढत होते. यावेळी चौघांनी सेल्फी काढण्यासाठी पोज दिल्या आणि यावेळी मागून ट्रेन आली. हा अपघात इतका भंयकर होता की, तिघांचे शरिराचे तुकडे 30 फूट अंतरावर पडलेले होते”, असं तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.