बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीचे टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स

शॉर्ट मेकिंग व्हिडीओ अॅप टिकटॉकचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. या अॅपवर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवत आहे.

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स
| Edited By: | Updated on: Dec 19, 2019 | 11:26 AM

मुंबई : शॉर्ट मेकिंग व्हिडीओ अॅप टिकटॉकचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. या अॅपवर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवत आहे. टिकटॉकने 17 डिसेंबर रोजी हॅशटॅग टिकटॉकरिवाइंड2019 (#TikTokRivinde2019) या मोहिमेतंर्गत कलाकारांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स (Tik tok most followers celebrity) असणाऱ्या युजर्सची यादी जारी केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने बाजी मारली आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने टिकटॉकवर 95 लाख फॉलोअर्ससह पहिले स्थान (Tik tok most followers celebrity) मिळवले आहे. त्यापाठोपाट अभिनेता रितेश देशमुख (68 लाख फॉलोअर्स), कपिल शर्मा (22 लाख फॉलोअर्स), माधुरी दिक्षित नेने (12 लाख फॉलोअर्स) आणि जीडे ब्रॅव्हो (15 लाख फॉलोअर्स) यांचा समावेश आहे.

तसेच टिकटॉकवर पाच संगीत कलाकारांच्या यादीत 1.25 कोटी फॉलोअर्ससह गायक नेहा कक्कड पहिल्या स्थानावर आहे. तर गुरु रंधावा 58 लाख फॉलोअर्स, टोनी कक्कड 41 लाख फॉलोअर्स, मिलिंद गाबा आणि अर्जून कानुनगो 31 लाख फॉलोअर्स आहेत. या पाच संगीत कलाकारांनी टिकटॉकच्या टॉप फाईव्हच्या यादीत स्थान मिळवले.

दरम्यान, जॅकलीन सध्या चित्रपट ‘ड्राईव्ह’मध्ये दिसली होती. तसेच ती लवकरच ‘किक 2’ चित्रपटाची शुटिंग सुरु करणार असल्याचे बोललं जात आहे. जॅकलीन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या प्रत्येक फोटोमुळे ती चर्चेत असते.