बाहुबलीतील ‘भल्लालदेव’ने 30 किलो वजन घटवलं, पाहा राणा दग्गुबतीचा डाएट प्लान

'हाथी मेरे साथी' या सिनेमासाठी राणा दग्गुबतीने तब्बल 30 किलो वजन घटवलं. त्यासाठी त्याने कडक डाएट आणि व्यायाम केला.

बाहुबलीतील भल्लालदेवने 30 किलो वजन घटवलं, पाहा राणा दग्गुबतीचा डाएट प्लान
| Updated on: Feb 26, 2020 | 2:19 PM

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमांमधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि बाहुबली फेम राणा दग्गुबती (Rana Daggubati Reduce 30 Kg) आता त्याच्या नवीन सिनेमाच्या तयारीला लागला आहे. बाहुबलीमध्ये राणा दग्गुबतीने त्याच्या ‘भल्लालदेव’ या पावरफुल्ल भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली. त्यानंतर आता तो त्याचा आगामी सिनेमा ‘हाथी मेरे साथी’मध्ये एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. यासाठी राणाने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे.

‘मीड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत राणा दग्गुबतीने (Rana Daggubati Reduce 30 Kg) त्याने कशाप्रकारे 30 किलो वजन कमी केलं हे सांगितलं. “हा सिनेमा खरा दिसावा अशी प्रभू सरांची इच्छा होती. बारीक दिसण्यासाठी मी फिजीकल ट्रेनिंग घेतली, सोबतच मला माझं डाएटही बदलावं लागलं”, असं राणाने सांगितलं.

“माझा व्यायाम पूर्णपणे बदलला. ट्रेनिंगवर लक्ष द्यावं लागलं. मी माझं वेट-ट्रेनिंग सुरु ठेवण्याऐवजी बऱ्याच काळापर्यंत चालणाऱ्या कार्डिओव्हॅस्कूलक सेशन घेतले. यामध्ये सर्वात आधी डाएटवर काम केलं जातं”

“मी प्रोटिन्स घेणं बंद केलं आणि काही काळासाठी शाकाहारी बनलो. मी मीठ खाणेही कमी केलं. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर मी कमी खाणे सुरु केले. मी हेच डाएट सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोन वर्षांपर्यंत घेतलं.”

‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात राणा दग्गुबती हा पांढरे केस आणि दाढी असलेल्या लूकमध्ये दिसेल. हा सिनेमा येत्या 2 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता पुलकीत सम्राटही मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय, सिनेमात अभिनेत्री जोया हुसैन आणि श्रेया पिळगावकरही दिसतील.

या सिनेमाची कहाणी ही काजिरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर झालेल्या अत्याचारावर आहे. सिनेमाचं शूटिंग दोन वेगवेगळ्या देशांमध्ये झालं आहे. भारतात या सिनेमाचं शूट केरळ (Rana Daggubati Reduce 30 Kg), महाबलेश्वर आणि मुंबईत झाली. तर सिनेमाचा काही भाग हा थायलंडमध्ये शूट करण्यात आला.