दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस, आतापर्यंत 122 मिमी पावसाची नोंद

मराठवाडा विभागात गेल्या 24 तासात नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरी 15.57 मि.मी, लातूर जिल्ह्यात 14.43 मि.मी, परभणी जिल्ह्यात 12.77 मि.मी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस, आतापर्यंत 122 मिमी पावसाची नोंद
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 9:58 AM

मराठवाडा : मुंबई, कोकण, नाशिक, पुणे या ठिकाणी सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त मराठावाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र चांगला पाऊस पडत आहे. यामुळे नागरिक सुखावले असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.

मराठवाडा विभागात गेल्या 24 तासात नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरी 15.57 मि.मी, लातूर जिल्ह्यात 14.43 मि.मी, परभणी जिल्ह्यात 12.77 मि.मी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. दरम्यान मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी 122.13 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यानुसार औरंगाबादमध्ये काल 0.10 मिमी, फुलंब्री 0.00, पैठण 0.40, सिल्लोड 0.00, सोयगाव 0.00, वैजापूर 0.60, गंगापूर 0.00, कन्नड 0.50, खुलताबाद 0.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर 1 जूनपासून आतापर्यंत औरंगाबाद 144.30 मिमी, फुलंब्री 205.75, पैठण 68.37, सिल्लोड 212.19, सोयगाव 182.67, वैजापूर 142.00, गंगापूर 120.56, कन्नड 130.25, खुलताबाद 102.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत जिलह्यात एकूण 145.34 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच जालन्यात काल 1.88 मिमी, बदनापूर 0.00, भोकरदन 0.00, जाफ्राबाद 0.00, परतूर 10.40, मंठा 11.25, अंबड 0.00, घनसावंगी 2.86 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 1 जूनपासून आतापर्यंत जालन्यात 102.31 मिमी, बदनापूर 140.80, भोकरदन 235.88, जाफ्राबाद 152.80, परतूर 118.10, मंठा 132.50, अंबड 90.14, घनसावंगी 98.86 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 133.92 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

त्याशिवाय परभणी जिल्ह्यात काल 14.50 मिमी, पालम 2.00, पूर्णा 21.80, गंगाखेड 2.75, सोनपेठ 20.00, सेलू 9.20, पाथरी 12.67, जिंतूर 20.33, मानवत 11.67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर 1 जूनपासून आतापर्यंत परभणी जिल्ह्यात 105.73 मिमी, पालम 90.33, पूर्णा 124.20, गंगाखेड 128.50, सोनपेठ 138.00, सेलू 74.00, पाथरी 103.67, जिंतूर 128.33, मानवत 144.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत  एकूण  115.20 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तसेच हिंगोलीत काल 3.71 मिमी, कळमनुरी 2.17, सेनगाव 5.17, वसमत 9.86, औंढा नागनाथ 27.75 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर 1 जूनपासून आतापर्यंत हिंगोलीत 127.00 मिमी , कळमनुरी 162.92, सेनगाव 112.17, वसमत 76.71, औंढा नागनाथ 179.25 मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 131.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तर नांदेड जिल्ह्यात काल 27.95 मिमी, मुदखेड 10.67, अर्धापूर 11.33, भोकर 2.25, उमरी 9.33, कंधार 8.50, लोहा 3.20, किनवट 12.29, माहूर 7.25, हदगाव 2.00, हिमायत नगर 0.00, देगलूर 34.67, बिलोली 38.40, धर्माबाद 12.33, नायगाव 19.60, मुखेड 49.29 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 1 जूनपासून आतापर्यंत नांदेडमध्ये 116.25, मुदखेड 126.67, अर्धापूर 110.32, भोकर 104.25, उमरी 111.12, कंधार 97.00, लोहा 81.98, किनवट 145.90, माहूर 208.94, हदगाव 119.71, हिमायत नगर 100.33, देगलूर 89.33, बिलोली 135.80, धर्माबाद 96.67, नायगाव 115.60, मुखेड 146.86 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर  जिल्ह्यात एकूण 119.17 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

त्याशिवाय काल बीड जिल्ह्यात 2.00 मिमी, पाटोदा 0.00, आष्टी 0.00, गेवराई 7.40 , शिरुर कासार 1.33, वडवणी 10.50, अंबाजोगाई 1.80, माजलगाव 13.27, केज 0.00, धारुर 0.00, परळी 3.20 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, 1 जूनपासून बीड जिल्ह्यात 101.18, पाटोदा 128.75, आष्टी 102.43, गेवराई 73.60, शिरुर कासार 70.00, वडवणी 89.00, अंबाजोगाई 68.40, माजलगाव 127.93, केज 95.71, धारुर 95.00, परळी 70.60 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 92.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तसेच काल लातूर जिल्ह्यात 0.00 मिमी, औसा 11.00, रेणापूर 2.00, उदगीर 28.57, अहमदपूर 12.00, चाकुर 14.60, जळकोट 50.50, निलंगा 16.75, देवणी 8.83, शिरुर अनंतपाळ 0.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय 1 जूनपासून लातूरमध्ये 99.50 मिमी, औसा 67.14, रेणापूर 103.75, उदगीर 121.86, अहमदपूर 164.33, चाकुर 100.20, जळकोट 175.50, निलंगा 117.75, देवणी 143.17, शिरुर अनंतपाळ 103.67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर जिल्ह्यात एकूण 119.69 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

त्याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात 11.13 मिमी, तुळजापूर 11.29, उमरगा 10.60, लोहारा 23.67, कळंब 0.33, भूम 6.40, वाशी 1.00, परंडा 1.60 मिमी पावसाची गेल्या 24 तासात नोंद करण्यात आली आहे. तर, 1 जूनपासून आतापर्यंत उस्मानाबादमध्ये 111.38 मिमी, तुळजापूर 126.71, उमरगा 153.20,  लोहारा 124.67, कळंब 109.00, भूम 118.60, वाशी 137.00, परंडा 72.40 पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 119.12 मि.मी. पाऊस झाला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.