कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापारी आक्रमक, लिलाव थांबवला

कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे.

कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापारी आक्रमक, लिलाव थांबवला
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 10:36 AM

लासलगाव : केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे 1400 रुपयांची कांदा बाजार भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर आक्रमक होत कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. आजा कांद्याला जास्तीतजास्त 5500 रुपये, सरासरी 5100 रुपये तर कमीतकमी 2000 रुपये मिळाला आहे. (traders aggressive after central government Restrictions on onion storage halting the auction)

मिळालेल्या माहितीनुसार, कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे.

खरंतर, देशातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला होता. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदा महाग का होत आहे? महाराष्ट्रातील लासलगावात चांगल्या कांद्याचा बाजारभाव दर क्विंटल 6 हजार 802 रुपयांवर पोहोचला. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

तुमच्या खात्यात परत येतील पैसे, कर्जाच्या व्याज सवलती संदर्भात सरकारकडून गाइडलाईन्स जारी

कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत खाली येणार नाहीत? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. म्हणूनच व्यापा-यांनी होर्डिंगही सुरू केले आहेत. नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईल, तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे हॉटेल आणि ढाबे सुरू करणे. त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून, कांदा महाग होत आहे.

(traders aggressive after central government Restrictions on onion storage halting the auction)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.