
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 17 मे पर्यंत असणारा लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात (Traffic on Mumbai-Aagra Highway deu to labor) आहे. त्यामुळे मुंबईत अडकलेले परप्रांतिय मजूर मुंबईबाहेर पडत आहेत. यावेळी तो मिळेल त्या वाहनाने घरी जात आहे. तर काहीजण थेट 16-1700 किलोमीटर अंतर पायी चालत जात आहे.

मुंबई-आग्रा हायवेवर शेकडोंच्या संख्येने हे सर्व तरुण पायी चालतानाचे चित्र गंभीर आहे. दीड महिन्यांपासून कळ काढून थांबलेल्या उत्तर भारतीयांचा संयम आता संपलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे मजूर गावाकडे जाण्यास निघाले आहेत.

आजपासून ट्रेन सुरू होतील हे वारंवार सांगूनही यावर मजुरांचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे जसे जमेल तसे करत आम्ही जाऊ पण आता इथे थांबणार नाही असाच पवित्रा या मजुरांनी घेतला आहे.

लॉकडाऊन सुरू असतानाही मुंबई आग्रा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सायकल, ट्रक, रिक्षा, टेंम्पो आणि काहीच नाही तर शेवटी चालत किंवा सायकलवर गावी निघालेल्यांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. यातच 10-10 च्या टेम्पोमध्ये 20-20 जनावरांसारखी माणस कोंबून कोंबून बसून जात आहेत. ना कुठलं सोशल डिस्टन्सिंग आहे ना कुठली सुरक्षा.

काम नाही, पैसे संपले, जे काही उरलय ते घेऊन 1600 किमीवर असणाऱ्या घराकडे अनेक मजूर निघाले आहेत. दिवसभराच्या उन्हात विसावा घेत रात्रभर चालायच असा नित्यक्रम सुरू आहे. मुंबईतील सायन परिसरातून काल चालत निघालेली मंडळी पहाटे 3 च्या सुमारास कसारा घाटात पोहोचली आहेत.

लॉकडाऊन अजून संपायच्या आधीच मुंबईतून निघालेल्या हजारो वाहनांनी मुंबई-आग्रा हायवे संपूर्णपणे जमा केला आहे.

लॉकडाऊन जर संपलं नाही तर मुंबईत राहायचे तरी कसे या विचाराने मिळेल त्या वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास मजूर करत आहेत. अचानकपणे हजारो वाहने बाहेर पडल्याने हायवेवर ठिकठिकाणी ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आहे.