नंदुरबारमध्ये बस ४० फूट खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू, 35 प्रवासी गंभीर जखमी

जळगावहून सुरतकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स कोंडाबाई घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून थेट 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली.

नंदुरबारमध्ये बस ४० फूट खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू, 35 प्रवासी गंभीर जखमी
| Edited By: | Updated on: Oct 21, 2020 | 7:30 AM

नंदुरबार : बुधवारी सकाळी राज्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 35 प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Travels crashed into deep valley in nandurbar 4 people died 35 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स गाडी दरीत कोसळली. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाबाई घाटात हा भीषण अपघात घडला आहे. जळगावहून सुरतकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स कोंडाबाई घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून थेट 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कार्य घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना तातडीने दरीतून बाहेर काढत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर नेमका अपघात कसा झाला याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ट्रॅव्हल्सही प्रवाशांनी भरली होती. तब्बल 35 ते 40 जण हे गाडीमध्ये असल्याचं सांगण्यात आहे. त्यानुसार पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या –

मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक

(Travels crashed into deep valley in nandurbar 4 people died 35 injured)