आओ देश बदलें… ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ लॉन्च

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

‘आओ देश बदलें’ असे म्हणत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीने पदार्पण केले आहे. 31 मार्च रोजी सकाळपासून ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने हिंदी वृत्तसृष्टीत आगमन करत, सुरुवातीलाच प्रेक्षक/वाचकांची मनं जिंकली आहेत. फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावरुन जोरदार स्वागत करण्यात आलं. अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहेत. नव्या स्वरुपात बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘टीव्ही […]

आओ देश बदलें... ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ लॉन्च
Follow us on

‘आओ देश बदलें’ असे म्हणत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीने पदार्पण केले आहे. 31 मार्च रोजी सकाळपासून ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने हिंदी वृत्तसृष्टीत आगमन करत, सुरुवातीलाच प्रेक्षक/वाचकांची मनं जिंकली आहेत. फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावरुन जोरदार स्वागत करण्यात आलं. अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहेत.

नव्या स्वरुपात बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘टीव्ही 9 भारतवर्ष’चा असेल. शिवाय, लोकांच्या विचारात सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्नही केला जाईल, असा विश्वासही ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने व्यक्त केला आहे.

भारतासह जगभरातील घडामोडी, त्या घडामोडींचं विश्लेषण ‘टीव्ही 9 भारतवर्ष’वर केले जाईल.

https://www.youtube.com/watch?v=wwgvFkAkpf0

एखादी बातमी लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना, त्यातील सत्यताही तपासण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. राजकीय बातम्या देतानाच, सांस्कृतिक, गुन्हेगारी, खेळ इत्यादी क्षेत्राही बाजूला ठेवणार नाही. प्रत्येक प्रांतातील बातमी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’वर वाचता/पाहता येईल.

इतिहासातील रंजक प्रसंग, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्याचे धक्के बसतील, असेही या व्यासपीठावरुन सांगण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला उपयुक्त असणारी प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ.

‘टीव्ही 9 भारतवर्ष’च्या लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी ‘राष्ट्रीय संमेलन’चे आयोजन करण्यात आल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित साह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्यासह अनेक दिग्गज नेते ‘राष्ट्रीय संमेलना’त सहभागी होणार आहेत.

डिश टीव्ही, व्हिडीओकॉन आणि टाटा स्कायसह इतर अन्य प्लॅटफॉर्मवर तुम्ही TV9-Bharatvarsh पाहू शकता.