
मुंबई : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश म्हणजे भारत. जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा 17 % इतकी लोकसंख्या भारतात आहे. भारत जसा लोकशाहीप्रधान देश समजला जातो त्याचप्रमाणे तो कृषीप्रधान देश म्हणूनही ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात प्रामुख्याने भात, गहू आणि ऊस ही पिके घेतली जातात. ही पिके भारताच्या एकूण पीक उत्पादनामधील 90 % वाटा उचलतात. तर, भारत कृषीप्रधान देश असल्याने देशातील एकूण पाण्यापैकी 80 ते 90 % पाणी शेतीसाठी वापरले जाते. यानंतर घरगुती वापरासाठी आणि उद्योग क्षेत्रासाठी पाण्याचा वापर केला जातो. परंतु, देशातील कृषी क्षेत्रातील जल व्यवस्थापनाला चालना देण्यासंबंधित एका अहवालामध्ये 2050 पर्यंत भारतातील 50% पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पाण्याचे तीव्र संकट निर्माण होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशातील जलसंकटामागे कृषी क्षेत्र हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. तसेच, सिंचनाच्या पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास 20 टक्के पाण्याची बचत होऊ शकते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे जलसंकट टाळायचे असेल पाण्याचा मोठा स्रोत असलेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे हा...