राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्या, जलमंदिर पॅलेसमधील भेटीनंतर उदयनराजेंच्या दरेकरांना शुभेच्छा

| Updated on: Oct 22, 2020 | 12:24 PM

"भाजपचा पाया घसरत चालला आहे का, या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय मोकळा नाही" असे म्हणत उदयनराजेंनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलणेही टाळले.

राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्या, जलमंदिर पॅलेसमधील भेटीनंतर उदयनराजेंच्या दरेकरांना शुभेच्छा
Follow us on

सातारा : प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही विरोधीपक्ष नेत्यांनी राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्यावीत, अशा भावना भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या. प्रवीण दरेकरांनी साताऱ्यातील उदयनराजेंच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. (Udayanraje Bhosle meets Pravin Darekar at Satara Jal Mandir Palace Residence)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सातारा दौऱ्यावर आहेत. उदयनराजे भोसलेंनी आपल्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी दरेकरांचे स्वागत केले. “प्रवीण दरेकर हे माझे मित्र आहेत. दरेकरांनी माझ्या घरी यावे, ही खूप दिवसांपासून माझी इच्छा होती, ती आज पूर्ण झाली” अशा भावना उदयनराजेंनी व्यक्त केल्या. भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंनी ट्विटरवरुन दिली.

“प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्यावीत. सर्वसामान्य जनतेची सध्या ससेहोलपट होत आहे. मेजॉरिटी असूनही राजकारणामुळे हे सरकार होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे” असंही उदयनराजे म्हणाले.

“विचार वेगवेगळे असल्यामुळे लोकहिताचे निर्णय सरकार घेऊ शकत नाहीत. एकत्र विचार असतील तर कुठल्याच ताकदीच्या अमिषाची गरज लागत नाही. नजीकच्या काळात लवकरच देवाच्या कृपेने चांगलं घडेल आणि लोकांचे प्रश्न मार्गी लागतील” अशी अप्रत्यक्ष टीका उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

“भाजपचा पाया घसरत चालला आहे का, या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय मोकळा नाही” असे म्हणत उदयनराजेंनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलणेही टाळले.

संबंधित बातम्या :

एक राजा बिनडोक, तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर, प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात

(Udayanraje Bhosle meets Pravin Darekar at Satara Jal Mandir Palace Residence)