अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची आणखी 14 संपत्ती जप्त होणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा गुन्हेगारी विश्वातील बादशाह. गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारतर्फे दाऊद इब्राहिम आणि त्याची बहिण हसीना पारकर यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त केल्यानंतर आता त्याच्या मुळ गाव कोकणातील संपत्तीही जप्त केली जाणार आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असणाऱ्या मुंबके गावात असलेल्या 14 मालमत्तेचा लिलाव लवकरच करण्यात येणार […]

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची आणखी 14 संपत्ती जप्त होणार
Follow us on

रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा गुन्हेगारी विश्वातील बादशाह. गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारतर्फे दाऊद इब्राहिम आणि त्याची बहिण हसीना पारकर यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त केल्यानंतर आता त्याच्या मुळ गाव कोकणातील संपत्तीही जप्त केली जाणार आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असणाऱ्या मुंबके गावात असलेल्या 14 मालमत्तेचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे. तस्करी विरोधी संस्थेद्वारे या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे

रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या मुंबके गावात मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊदचा बंगला आहे. तीन मजली असलेला हा बंगला दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावे आहे. याशिवाय दाऊदच्या मुंबके गावात विविध ठिकाणी 14 जमिनी आहेत. या सर्व मालमत्तांची खरेदी गुन्हेगारी पैशातून करण्यात आली आहे.

खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहेत. सध्या दाऊदचे संपूर्ण कुटूंब मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीटवर फॅल्टमध्ये राहतात. मात्र दाऊदचे कुटूंब 1980 दरम्यान खेडच्या बंगल्यात राहायचे. त्यानंतर 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आलं नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भितींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षापासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असं असलं तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदच्या हात असलेल्या संशयावरुन 38 वर्षांपूर्वी दाऊदचा हा बंगला सरकारद्वारे सील करण्यात आला होता. मात्र काही वर्षांपासून या बंगल्यात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या घराकडे काही पोलिसांना तैनात केले आणि याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सूचना केल्या. मात्र आता हा बंगला अत्यंत जीर्ण झाला असून तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे हा बंगला ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. तसेच याबाबतचे पत्रही ग्रामपंचायतीला देण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील नागपाडा विभागात असणार हा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला होता. त्यानंतर आता तस्करी विरोधी संस्थेने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या 14 मालमत्तांची किंमत ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कुख्यात गुंड दाऊदच्या मूळ गावातील 14 मालमत्तांवर लवकरच जप्ती येणार आहे. यामुळे दाऊद आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दाऊद इब्राहिम कोण?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 63 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.