राहुल गांधीनंतर, पोलिसांनी प्रियांका गांधींची कॉलर पकडली, ‘भाजपवालो करार जवाब मिलेगा’, सत्यजीत तांबेंचा इशारा

| Updated on: Oct 04, 2020 | 12:25 AM

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींची देखील यू.पी. पोलिसांनी कॉलर पकडली होती तसंच त्यांना धक्काबुक्की केली होती.

राहुल गांधीनंतर, पोलिसांनी प्रियांका गांधींची कॉलर पकडली, भाजपवालो करार जवाब मिलेगा, सत्यजीत तांबेंचा इशारा
Follow us on

हाथरसयूपी पोलिसांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींची देखील यू.पी. पोलिसांनी कॉलर पकडली होती तसंच त्यांना धक्काबुक्की केली होती. आज (3 ऑक्टोबर) पुन्हा एकदा यू.पी. पोलिसांनी प्रियांका गांधींची कॉलर पकडून बेशिस्त वर्तन केलंय. (Up Police Miss Behaved With priyanka Gandhi Satyajeet Tambe Warns BJP)

पोलिसांनी प्रियांका गांधींचा कॉलर पकडलेला फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या फोटोवर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. तसंच सोशल मीडियावर देखील यू.पी. पोलिसांच्या वागणुकीवर संतप्त प्रतिक्रिया येतायेत.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा फोटो ट्विट करत संताप व्यक्त केलाय. ‘भाजपवालो तुम्हे करारा जवाब मिलेगा’, असा इशारा त्यांनी दिलाय. सत्यजीत तांबे म्हणाले, “आपल्याच आई बहीणीवर असा जर प्रसंग आला तर आपण सहन करू का? अतिशय असंवेदनशील पद्धतीने यू.पी. सरकार आणि पोलिस हाथरस प्रकरण हाताळत आहेत. आज प्रियांका गांधी यांचा कॉलर पकडलेला जो फोटो व्हायरल होतोय, हे कोणताही काँग्रेस नेता आणि कार्यकर्ता सहन करू शकत नाही”

दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त करत योगी सरकारला सुनावलं आहे. योगीजी आपल्याकडे महिला पोलिस नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

राहुल गांधींची पकडली होती कॉलर

राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काही काँग्रेस कार्यकर्ते (1 तारखेला) पीडित कुटुंबीयांच्या भेटीला दिल्लीवरून हाथरसकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. पीडित कुटुंबाची भेट घेऊ दिली नाही. तसंच पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

यूपी पोलिसांनी राहुल गांधी यांना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. मुंबईत देखील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करत यू,पी. सरकारचा निषेध व्यक्त केला.

राहुल गांधी-प्रियांका गांधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

तत्पूर्वी हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. तब्बल पाच तास प्रवास केल्यानंतर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी पोहोचले. यावेळी प्रियांका यांना पाहताच पीडितेच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांचा अक्रोश पाहून प्रियांका यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी पीडितेच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी “न्यायासाठी आम्ही संघर्ष करू. काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाहीत”, असं सांगत राहुल यांनी या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तब्बल 25 मिनिटे राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं म्हणणंही ऐकून घेतलं.

अन्यायाविरुद्ध लढणार: प्रियांका

अन्यायाविरुद्ध आम्ही लढतच राहणार आहोत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आमचा संघर्ष राहील. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, असं यावेळी प्रियांका गांधी यांनी सांगितलं. आम्ही अन्यायाच्या विरोधात उभं राहू. जोपर्यंत न्याय होत नाही. तोपर्यंत आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही लढतच राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

(Up Police Miss Behaved With priyanka Gandhi Satyajeet Tambe Warns BJP)

संबंधित बातम्या

हाथरसप्रकरणी योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल, CBI चौकशीचे आदेश

न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले

LIVE | नोएडा ते हाथरस, राहुल गांधींचा मार्च

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं